×
Homeताज्या बातम्याJio - Airtel - Vi - BSNL | एक महिन्यापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील...

Jio – Airtel – Vi – BSNL | एक महिन्यापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील SIM, हे आहेत Jio, Airtel, Vi आणि BSNL चे प्लान, TRAI ने जारी केली लिस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio – Airtel – Vi – BSNL | TRAI च्या आदेशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी एक महिन्याची वैधता असलेले काही प्लॅन लाँच केले आहेत. Airtel, Jio, Vi, BSNL ई. सर्व दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये यापूर्वी अशा प्लॅनचा समावेश केला आहेत. हे सर्व प्लॅन एक महिना आणि 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. ट्रायने सर्व कंपन्यांना अशा किमान एका प्लॅनचा समावेश करण्यास सांगितले होते.

 

आता ट्रायने या प्लॅनची यादी जाहीर केली आहे. ग्राहकांच्या तक्रारींनंतर ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना असे रिचार्ज प्लॅन जारी करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी, बहुतेक प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध होती. मात्र, 28 दिवसांच्या वैधतेचे प्लॅन अजूनही कंपन्यांनी ठेवले आहेत.

Airtel चे दोन प्लॅन
एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये 128 रुपये आणि 131 रुपयांच्या दोन प्लॅनचा समावेश आहे. 128 रुपयांमध्ये 30 दिवसांची वैधता मिळेल. यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉल 2.5 पैसे प्रति सेकंद या दराने उपलब्ध आहेत.

Jio
TRAI च्या आदेशानंतर जिओने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन प्लॅनचा समावेश केला आहे. एक महिन्याची वैधता असलेला जिओ प्लॅन 259 रुपयांचा आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5जीबी डेटा, अमर्यादित कॉल, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.

 

BSNL आणि MTLN चे प्लॅन
बीएसएनएलचा 30 दिवसांची वैधता असलेला रिचार्ज प्लॅन 199 रुपयांचा आहे,
तर एका महिन्याच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 229 रुपये आहे.
दुसरीकडे, एमटीएनएल कंपनी 151 आणि 97 रुपयांचे दोन प्लॅन ऑफर करते.

 

Vi रिचार्ज प्लॅन
Vodafone Idea (Vi) 137 रुपये प्लॅनची 30 दिवसांची वैधता आहे.
यामध्ये ग्राहकांना 10 लोकल नाईट मिनिट्स, 2.5 पैसे प्रति सेकंद दराने कॉलिंग,
1 रुपये आणि 1.5 रुपये दराने लोकल आणि एसटीडी एसएमएस मिळतात.
या सर्व सेवा एका महिन्यासाठी 141 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध असतील.

 

Web Title :- Jio – Airtel – Vi – BSNL | trai list 30 days and one month validity plans of jio airtel bsnl vi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | …शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देताना यावर्षीच दिरंगाई का? सुनिल प्रभूंनी केले हे वक्तव्य

 

Pune Crime | मोठ्या भावानेच केला लहान भावाचा गळा दाबून खून, पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना

 

Devendra Fadnavis | ‘नाना पटोलेंना असे झटके येत असतात, त्यामुळे ते…’, मोदींवरच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News