Jio-Airtel-VI Plans | स्वस्त पडतो वार्षिक रिचार्ज पॅक ! 1000 रुपयांपर्यंत करू शकता सेव्हिंग; जाणून घ्या Jio, Airtel आणि VI मध्ये कुणाची किंमत सर्वात चांगली?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio-Airtel-VI Plans | मोबाईलचा अनिलिमिटेड रिचार्ज प्लान महाग झाला आहे. रिलायन्स जिओने एक डिसेंबरपासून रिचार्ज प्लानवर 21 टक्के वाढ केली आहे. तर एयरटेल आणि वोडाफोन आयडियाने रिचार्ज प्लानवर 25 टक्के वाढ केली आहे. ज्यामुळे लोकांना मंथली रिचार्ज प्लानवर 50 ते 100 रुपयांपर्यंत जास्त खर्च करावा लागतो. (Jio-Airtel-VI Plans)

 

तर वार्षिक प्लान 600 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. यानंतर सुद्धा मंथली प्लानच्या तुलनेत वार्षिक प्लान जास्त स्वस्त आहे. परंतु येथे तुम्हाला प्लानवर अनेक विविधता मिळते.

 

जाणून घेवूयात जियो, एयरटेल आणि व्हीआयच्या प्लानबाबत :

1. रिलायन्स जिओचा वार्षिक प्लान (Reliance Jio’s Annual Plan)
रिलायन्स जिओबाबत बोलायचे तर जियोकडे 44 कोटीपेक्षा जास्त ग्राहक सध्या आहेत. जियो ग्राहकांना 2879 रुपयात वार्षिक प्लान ऑफर करते, ज्यामध्ये ग्राहकांना 2जीबी डेटा दररोज दिला जातो.

 

ज्याची वैधता 365 दिवसांची आहे. याशिवाय यामध्ये आणखी अनेक ऑफर दिल्या जातात. जसे की SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि आणखीही ऑफर मिळतात.

 

याच्या 2जीबी मंथली प्लानबाबत बोलायचे तर 299 रुपयांमध्ये 2जीबी प्रतिदिन डेटा SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. जर कुणी यूजर 299 रुपयांचा प्लान वापरत असेल तर त्यास वर्षभरात 13 रिचार्ज करावे लागतील. या हिशेबाने हा खर्च 3887 रुपये होतो. म्हणजे वार्षिक प्लानच्या तुलनेत 1008 रुपये जास्त खर्च होतील. (Jio-Airtel-VI Plans)

2. एयरटेलचा वार्षिक प्लान (Airtel’s annual plan)
भारती एयरटेलकडे देशात 35 कोटी ग्राहक आहेत. त्यांचा वार्षिक प्लान 2999 रुपयांचा आहे. यामध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटीसह डेली 2जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड SMS, अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याच्या तुलनेत मंथली प्लान 359 रुपयांचा येतो.

 

जर कुणी यूजर 359 रुपयांचा प्लान वापरत असेल तर त्यास वर्षभरात 13 रिचार्ज करावे लागतील. या हिशेबाने त्याचा खर्च 4667 रुपये होईल. म्हणजे वार्षिक 1668 रुपये खर्च करावा लागेल.

 

3. वोडाफोन आयडिया काय देत आहे ऑफर (Vodafone Idea annual plan)
Vi कडे देशातील 27 कोटी ग्राहक आहेत, कंपनीचा 2जीबी डेटाचा वार्षिक प्लान आहे.
हा 1.5 जीबी डेटा वार्षिक देतो. या प्लानची किंमत 3099 रुपये आहे.
यामध्ये 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह डेली 1.5जीबी डेटा मिळतो.
प्लानमध्ये अनलिमिटेड SMS, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळते.

 

याशिवाय या प्लानचा मंथली प्लान 299 रुपयांना येतो. यामध्ये 1.5जीबी डेटा दररोज मिळतो.
जर कुणी यूजरने 299 रुपयांचा रिचार्ज केला तर वर्षभरात त्याला 13 रिचार्ज मिळतात.
म्हणजे वार्षिक 3887 रुपये द्यावे लागतील. यामुळे तुम्हाला 788 रुपये जास्त द्यावे लागतील.

 

Web Title :- Jio-Airtel-VI Plans | more than 1000 rupees save on jio airtel and vi yearly plans read detail here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LIC Jeevan Anand Policy | 1400 रुपये जमा केल्यानंतर मिळतील 25 लाख रुपये, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीची वैशिष्ट्य

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ

 

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 51 जणांवर कारवाई