जिओ ‘त्या’ ग्राहकांना रोज देणार २ GB फ्री डेटा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच काहीना काही खास ऑफर दिल्या जातात. आता रिलायन्स जिओ आपल्या खास ग्राहकांना फ्री डेटा देणार आहे . रोज २ जीबी डेटा असे चार दिवस म्हणजे एकूण ८ जीबी डेटा ग्राहकांना फ्रीमध्ये मिळणार आहे.

असा चेक करा फ्री डेटा –

फ्री डेटा मिळाला कि नाही हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांना ‘माय जिओ अ‍ॅप’ डाउनलोड करावे लागेल.  त्यानंतर अ‍ॅपमध्ये लॉगिन करा . लॉगिन झाल्यानंतर माय जिओ अ‍ॅपमध्ये जाऊन खाली माय प्लान सेक्शनमध्ये जा.  माय प्लॅन सेक्शनवर फ्री डेटा तपासावा लागेल . जर ग्राहकांना माय प्लानमध्ये फ्री डेटा दिसला नाही तर रात्री १२ वाजेपर्यंत वाट पाहावे लागेल . कारण प्रत्येक दिवशी रात्री १२ नंतर माय प्लान रिफ्रेश केला जातो.

जिओचा नवीन प्लॅन –

भारतातील ब्रॉडब्रँड इंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून गिगाफायबरच्या प्रतिक्षेत आहे . जिओचा गीगाफायबर प्लॅन लवकरच लाँच करण्यात येणार आहे . यासाठी कंपनी सर्व ब्रॉडबँड प्लॅन जारी करणार आहे . जिओच्या प्री-व्यू ऑफरमध्ये कंपनी ९० दिवसांसाठी ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट देणार आहे. ग्राहकांना महिन्याला १०० जीबी डेटा मिळेल . तसेच जिओच्या प्रीमियम अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. कनेक्टिविटीसाठी जियोने डेन नेटवर्क्स, हॅथवे केबल आणि डाटाकॉमसोबत हातमिळवणी केली आहे.