फायद्याची गोष्ट ! Jio चा खुपच स्वस्त प्लॅन, 100 रूपयांपेक्षा कमीमध्ये करा महिनाभर ‘फ्री ‘कॉलिंग, मिळणार 3GB डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही कमी किंमतीत जास्त ऑफर देणारा प्लॅन घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी जिओने असे काही प्लॅन उपलब्ध करुन दिले आहेत. काही प्लॅन तर असेही आहेत ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे, याशिवाय या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्सची कोणतीही कमतरता नाही. जिओ प्रत्येक ग्राहकाला सुविधा देण्याच्या हिशोबाने स्वस्त प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि जास्त इंटरनेट डाटा देते. जिओ फोनचा विचार केला तर 75 रुपयांचा प्लॅन यात सहभागी आहे.

रिलायन्स जिओने आपल्या JioPhone यूजर्सला 75 रुपयांचा प्लॅन उपलब्ध करुन दिला आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात डाटा उपलब्ध करुन दिला आहे. जिओ.कॉमवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसह इतर अनेक फायदे मिळत आहे.

कसा आहे 75 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यात 3 जीबी डाटा बेनिफिट मिळेल. याशिवाय 50 एसएमएस प्रतिदिन मिळू शकतील.

दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी इतके कॉलिंग मिनिट –
जिओ टू जिओ कॉलिंग या प्लॅनमध्ये पूर्णपणे फ्री असेल. परंतु जर ग्राहक जिओ ऐवजी दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करतील त्यांना त्यासाठी 500 मिनिट देण्यात येतील. हा प्लॅन फक्त Reliance च्या JioPhone वरच उपलब्ध आहे.

या प्लॅनच्या इतर बेनिफिट्सचा विचार केला तर जिओ ग्राहकांना जिओ अ‍ॅपचे अ‍ॅक्सेस मोफत देते. यात जिओ म्युझिक, मुव्ही या अ‍ॅप्सचा समावेश आहे. ज्यात जिओ सिनेमा आणि जिओ सावन असे ही अ‍ॅप्स आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like