Jio Cheapest Plan | Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान ! ज्यामध्ये रोज मिळेल 1GB डेटा आणि फ्री कॉलिंग, इतक्या दिवसांची आहे व्हॅलिडिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Cheapest Plan | टेलिकॉम कंपन्यांचे प्लान्स आता पूर्वीपेक्षा महाग झाले आहेत. जिओने गेल्या वर्षी आपल्या प्लॅनच्या किमतीतही वाढ केली होती. स्वस्त प्लॅनमुळे कंपनीने बाजारात आपले स्थान निर्माण केले होते. अशावेळी, परवडणार्‍या योजनांच्या शोधात असलेल्या यूजर्सकडे फारसा पर्याय नसतो. (Jio Cheapest Plan)

 

मात्र, टेलिकॉम कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अशा काही योजना नक्कीच आहेत, ज्या कमी खर्चात अधिक फायदे देतात. जिओकडेही असा प्लान आहे, जो 1 जीबी रोजच्या डेटासह सर्वात स्वस्त पर्याय आहे.

जिओचा हा प्लान 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो.
या प्लॅनची किंमत आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांचा तपशील जाणून घेऊ या.

 

जिओचा 179 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा 1 जीबी दैनंदिन डेटा प्लान रू. 179 मध्ये येतो. यामध्ये यूजर्सना 24 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. (Jio Cheapest Plan)

यासोबतच यूजर्सना JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity चे सबस्क्रिप्शन देखील मिळते. 1 जीबी डेटाची FUP मर्यादा संपल्यानंतर, यूजरला 64 केबीपीएसच्या वेगाने डेटा मिळत राहील. मात्र, हा कंपनीचा सर्वात परवडणारा पर्याय नाही.

जिओचा 149 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा 149 रुपयाचा रिचार्ज प्लॅन 20 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा मिळतो. FUP मर्यादा संपल्यानंतर, यूजर्सना 64 केबीपीएसच्या वेगाने डेटा मिळत राहील. जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज मिळतील.

Advt.

यासोबत तुम्हाला JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. कंपनी 209 रुपयांचा प्लान देखील ऑफर करते, ज्याची वैधता 28 दिवस आहे.

 

Web Title :-  Jio Cheapest Plan | jio cheapest plan with 1gb daily data unlimited calling and 100 sms

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा