Jio Cricket Plan | आयपीएलआधी जिओने लॉन्च केले ‘हे’ तीन जबरदस्त प्लॅन्स; जाणून घ्या प्लॅन्सची खासियत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : क्रिकेट हा जरी भारताचा पारंपारिक खेळ नसला तरी क्रिकेटचे चाहते भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. सर्व क्रिकेट चाहते हे दरवर्षी आयपीएलची (IPL 2023) आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या आयपीएलला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदाचा सीझन हा आयपीएलचा 16 वा सिझन असणार आहे. आता क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेटप्रेमींना आयपीएलचा मनमुरादपणे आनंद घेता यावा म्हणून देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असणाऱ्या Reliance Jio ने आपल्या वापरकर्त्यांसाठी 3 जबरदस्त क्रिकेट प्लॅन (Jio Cricket Plan) लॉन्च केले आहेत. जिओने लॉन्च केलेल्या नवीन प्लॅन्समध्ये (Jio Cricket Plan) वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. जेणेकरून क्रिकेट रसिकांना आयपीएलचा आनंद घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया या तीन प्लॅन्सविषयी…

1) 999 रुपयांचा jio cricket plan

जिओने क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा आनंद घेता यावा यासाठी जिओचा 999 रुपयांचा क्रिकेट प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. तसेच यामध्ये युझर्सला दररोज 3 जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये 241 रुपयांचे मोफत व्हाउचरदेखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक्सट्रा 40 जीबी डेटा मिळेल.

2) 399 रुपयांचा jio cricket plan

जिओने क्रिकेट प्रेमींसाठी 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅनदेखील लॉन्च केला आहे. यामध्ये वापरकर्त्याला 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच यामध्येदेखील युझर्सला दररोज 3 जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये 61 रुपयांचे मोफत व्हाउचरदेखील देण्यात येत आहे. यामुळे युझर्सला 6 जीबी डेटा एक्सट्रा मिळणार आहे. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील करता येणार आहे.

3) 219 रुपयांचा jio cricket plan

219 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र यामध्ये तुम्हाला 14 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्येदेखील 25 रुपयांचे मोफत व्हाऊचर देण्यात येत आहे. यामुळे तुम्हाला 2 जीबी एक्सट्रा डेटा मिळेल. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगदेखील असणार आहे.

Advt.

जिओ डेटा अ‍ॅड ऑन प्लान

या तीन प्लॅन व्यतिरिक्त जिओने क्रिकेट अ‍ॅड ऑन डेटा प्लॅन देखील लॉन्च केले आहेत.
यामध्ये तुम्हाला 222 रुपयांमध्ये 50 जीबी डेटा, 444 रुपयांमध्ये 100 जीबी डेटा व 667 रुपयांमध्ये 150 जीबी डेटा मिळणार आहे.
आजपासून तुम्ही या प्लॅन्सचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनचा लाभ जुने आणि नवीन युझर्स दोघांनाही घेता येणार आहे.

Web Title :- Jio Cricket Plan | jio launches 3 cricket plans before ipl
2023 starts preapis recharge plans and unlimited calling 40 gb free deta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | ‘तर मिशीच काय… भुवया पण काढून टाकेन आणि…’, उदयनराजेंचे चॅलेंज शिवेंद्रराजे स्वीकारणार का? (व्हिडिओ)

Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | पुण्याच्या विकासाचे आव्हान राज्य सरकारने स्वीकारले; मोठ्या प्रकल्पांना गती मिळावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे