रिलायन्स जियोच्या ग्राहकांना 1 जानेवारी 2020 पासुन मिळणार ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्राय (TRAI) च्या नवीन पॉलिसीनुसार जिओने IUC चार्ज लावायला सुरुवात केली आहे. मात्र यामुळे ग्राहकांवर कोणताही मोठा बोजा पडणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे कारण 6 पैसे प्रती मिनिट दर आकारणीसोबतच कंपनी ग्राहकांना अतिरिक्त इंटरनेट डेटा देणार आहे. आजपासून हा दर लावण्यात येणार असून दुसऱ्या कंपनीच्या क्रमांकावर फोन केल्यास यापुढे तुम्हाला प्रतिमिनिट 6 पैसे दर द्यावा लागणार आहे.

म्हणून लावला 6 पैसे प्रति मिनटचा चार्ज
जिओ वरून दुसऱ्या नेटवर्कला कॉल केल्यावर हा चार्ज लागू होतो. ट्राय ने हा दर बंद करेपर्यंत हे सुरु होणार आहे. ट्राय 1 जानेवारीपासून IUC न लावण्यावर ठाम होते. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल केल्यावर IUC चार्ज लागू होतो. जिओ ग्राहकांना फ्री कॉलिंग देत होते. त्यामुळे IUC चार्ज जिओ भरत असे यामुळे जिओ ने आतापर्यंत विविध कंपन्यांना 13,500 कोटी रुपये चार्ज भरला आहे. त्यामुळे या नुकसानीपासून वाचण्यासाठी जिओने हा निर्णय घेतला आहे.

1 जानेवारी 2020 पासून द्यावा लागणार नाही चार्ज
ट्रायने जानेवारी 2017 मध्ये हा नियम लागू केल्यानंतर हा चार्ज 14 पैश्यांवरून 6 पैसे प्रतिमिनिट केला होता. हा दर त्यांनी 31 डिसेंबर 2019 पर्यंतच ठेवला होता. त्यामुळे 1 जानेवारी 2020 पासून जिओ ग्राहकांना हे दर द्यावे लागणार नाहीत. मात्र जर ट्रायने नियमांनुसार ते बंद नाही केले आणि चालूच ठेवले तर मात्र कंपनी ग्राहकांकडून हे चार्ज घेणे सुरूच ठेवणार आहे.

आययूसी चार्ज संपवण्याची जीओची तयारी
जिओच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या हे दर 31 डिसेंबर 2019 पर्यंत लागू केले आहेत. हे दर अस्थायी असून कायम स्वरूपी नाहीत. त्यामुळे ट्रायने नियमांत बदल केले तर ग्राहकांना 1 जानेवारी 2020 पासून हे चार्ज द्यावे लागणार नाही.

Visit : Policenama.com