Jio Fiber च्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर ! आता फक्त ‘एवढ्या’ रूपयांमध्ये 20 GB डाटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने ब्राँडबँड जिओ फायबर ग्राहकांसाठी नवीन डेटा प्लॅन आणला आहे. ज्याची सुरवात 101 रुपयांपासून होणार आहे. याबाबतची अधिक माहिती जिओच्या अधिकृत साईटवर उपलब्ध आहे. मात्र हे नावे प्लॅन पाहण्यासाठी ग्राहकांना लॉगिन करावे लागणार आहे. या प्लॅनमध्ये 20 जीबी पासून ते 2000 GB व 2TB पर्यंत डेटा मिळू शकतो. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती.

याबाबतच्या फायद्याविषयी बोलायचे झाले तर सध्या सुरु असलेल्या जिओ फायबरच्या प्लॅनचा डेटा संपल्यानंतर तुम्ही हे नवीन रिचार्ज करू शकता. या प्लॅननुसार उर्वरित डेटा पुढील महिन्यामध्ये मिळणार नाही.

जिओ फायबरने सुरु केलेले नवीन प्लॅन 101 रुपये, 251 रुपये, 501 रुपये, 1,001 रुपये, 2,001 रुपये आणि 4,001 रुपयांपर्यंतचे आहेत. या नव्या दरामुळे तुमच्या प्लॅनच्या वैधतेवर काही फरक पडणार नाही. लवकर डेटा संपणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन सुरु करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/