JioFiber झालं लॉन्च ! TV ‘व्हिडीओ’ कॉलिंग आणि ‘कॉन्फ्रेसिंग’सह मिळणार ‘या’ खास सुविधा, जाणून घ्या ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओ फायबरची सुविधा 5 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आली. या अंतर्गत वेलकम ऑफरमध्ये अनेक फ्रीबीज देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने ग्राहकांना एक नवीन गिफ्ट दिले आहे. आता तुम्ही घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने व्हिडिओ कॉल करु शकतात. यासाठी सेट टॉप बॉक्सला गिगा फायबर नेटवर्कने जोडावे लागेल. कंपनी उपलब्ध करुन देत असलेली ही सुविधा म्हणजे डिजिटल युगातील एक क्रांती समजली जात आहे. या संबंधित माहिती देताना कंपनीने आपल्या एजीएममध्ये उपलब्ध करुन देत असलेल्या सुविधांची माहिती दिली होती.

Reliance Jio Fiber ब्रॉडबँड सर्विसच्या प्लॅनची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून 10000 रुपयांपर्यंत असेल. कंपनीने दावा केला की, आतापर्यंत 16000 शहरात 15 मिलियन लोकांना Jio Fiber साठी नोंदणी केली आहे.

हे प्लॅन प्रीपेड असणार आहेत. कंपनीने सांगितले की, येणाऱ्या काळात हे प्लॅन पोस्टपेड देखील सुरु करण्यात येतील. प्लॅनची सुरुवात 699 रुपयांपासून होत आहे.

1. Jio Fiber चे महिन्याचा प्लॅन 699 रुपयांपासून सुरु होऊन 8,499 रुपयांपर्यंत असेल.

2. सर्व प्लॅनचे स्पीड 100 एमबीपीएसपासून सुरु होणार आहे.

3. तुम्ही 1 Gbps पर्यंत स्पीड मिळवू शकतात.

Jio Fiber वेलकम ऑफर –
1. jio fiber घेणारे ग्राहक jio Forever ची वार्षिक योजनाची सदस्यता घेतात तर त्यांना अधिक लाभ मिळणार आहे.

2. जिओ होम गेटवे

3. जिओ 4k सेटटॉप बॉक्स

4. टेलिव्हिजन सेट

5. ओटीटी अ‍ॅपलिकेशनची सदस्यता

6. अनियमित वॉइस आणि डेटा