Jio फायबरला ‘टक्कर’ देण्यासाठी airtel, BSNL कडून ‘धमाकेदार’ ऑफर्स, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या 42 व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की जिओचे 34 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत. सब्सक्राइबर, नफा आणि रिव्हेन्यूच्या आधारावर जिओ जगातली सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी झाली आहे. याचबरोबर त्यांनी कंपनीच्या अनेक नवीन सेवांची घोषणा केली असून यामध्ये त्यांनी जिओच्या सेट टॉप बॉक्सची देखील घोषणा केली. Jio Fiber या इंटरनेट ब्रॉडबँड सेवेची देखील घोषणा केली असून पुढील महिन्यात म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे.

रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार या इंटरनेटचा स्पीड हा 100 एमबीपीएस पासून 1 जीबीपीएस पर्यंत मिळणार आहे. या सेवेसाठी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसून ग्राहकांना केवळ राउटर साठी 2500 रुपये जमा करावे लागणार आहेत. ते देखील त्यांना रिफंड मिळणार आहेत. यासाठी 700 रुपयांपासून ते 10 हजाररुपयांपर्यंत मासिक खर्च येणार आहे.मात्र रिलायन्सच्या या घोषणेनंतर आता विविध कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सची घोषणा केली असून एअरटेल आणि बीएसएनएलने देखील आपल्या प्लॅन्सची घोषणा केली आहे.

एअरटेलमध्ये हे प्लान उपलब्ध
एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी चार प्लॅन सादर केले असून यामध्ये तुम्हाला 40Mpbs स्पीड मिळणार असून बेसिक प्लॅनचा हा स्पीड असून मोठ्या प्लॅनमध्ये हा स्पीड जास्त असणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 200GB डेटा देत असून 1099 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी 300GB डेटा मिळत आहे. त्याचबरोबर कंपनी 1699 रुपयांचा देखील प्लॅन देत असून यामध्ये 600GB डेटा आणि 1000GB बोनस डेटा उपलब्ध करून देत आहे.

BSNL चे प्लॅन्स
BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी अतिशय उत्तम प्लॅन उपलब्ध करून यामध्ये 777 रुपयापासून ते 17 हजार रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत. यामध्ये त्यांनी सर्वात बेसिक प्लॅन हा 777 रुपयांचा दिला असून यामध्ये 50Mbps चा स्पीड मिळेल. त्याचबरोबर 1 हजार 277 रुपयाचा देखील प्लॅन असून यामध्ये 750GB डेटा दिला जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –