‘Jio’नं बंद केली ‘ही’ जुनी ऑफर, ग्राहकांना आता ‘हा’ फायदा मिळणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Fiber प्रिव्ह्यु ऑफर आता नव्या ग्राहकांसाठी उपलब्ध नसणार आहे. ही ऑफर रिलायंस जिओकडून इंट्रोडक्टरी स्किम म्हणून सुरुवातीच्या ग्राहकांसाठी देण्यात आली होती ज्यामुळे ते हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हीस एक्सपेरियंस करू शकतील. ही प्रिव्ह्यु ऑफर जिओफायबर ब्रॉडबँड सर्व्हिसच्या कमर्शियल लाँचिंगआधी देण्यात आली होती. यासाठी राऊटरच्या टाईपच्या आधारावर 4500 किंवा 2500 रुपये रिफंडेबल सिक्योरिटी डिपॉझिट ठेवण्यात आलं होतं.

सप्टेंबरमध्ये जिओनें घोषणा केली होती की, प्रिव्ह्यु ऑफरच्या सध्याच्या सब्सक्रायबर्सना पेड प्लॅन्समध्ये मायग्रेट केलं जाईल. कंपनीकडून यातील अनेक सब्सक्रायबर्स मायग्रेट करणं बाकी आहे. नवीन ग्राहक आता प्रिव्ह्यु ऑफरचा लाभ घेऊ शकत नाहीत. नवीन जिओ युजर्स 699 रुपयांच्या(ब्राँझ प्लॅन)च्या सुरुवाती किंमतीने जिओ फायबरचा लाभ घेऊ शकतात. हे फ्री प्रिव्ह्यु ऑफर प्रमाणे असणार नाही. प्रिव्ह्यु ऑफरमध्ये ग्राहकांना 2500 रुपयांच्या सिक्योरिटी डिपॉझिटमध्येच इंटरनेट कनेक्टीव्हिटी दिली जात होती. ही ऑफर जुलै 2017 मध्ये सर्वात आधी स्पॉट करण्यात आली होती.

टेलिकॉमटॉकच्या रिपोर्टनुसार, नव्या ग्राहकांसाठी आता प्रिव्ह्यु ऑफर घेण्यासाठी संधी नाही. यात आश्चर्य करण्याच काहीच कारण नाही. कारण कंपनीनं आधीच घोषणा केली होती की, भारतात जिओफायबरच्या कमर्शियल लाँचिंगनंतर प्रिव्ह्यु ऑफर हळू हळू बंद केली जाईल. आतापर्यंत ऑपरेटरकडून नवीन आणि सध्याच्या ग्राहकांना ही प्रिव्ह्यु ऑफर दिली जात होती.

प्रिव्ह्यु ऑफरमध्ये जिओ ग्राहकांना 1.1TB (FUP) डेटा तसेच 100Mbps चा स्पीड दिला जात होता. हे फायदे 699 च्या प्लॅनमध्ये मिळत नाहीत. सध्या जिओकडे ब्राँझ व्यतिरीक्त सिल्व्हर प्लॅन आहे. याची किंमत 849 रुपये आहे. याशिवाय 1299 रुपयांचा गोल्ड प्लॅन, 2499 चा डायमंड आणि 3999 चा प्लॅटिनम, 8499 चा टायटेनियम प्लॅनही आहे. प्लॅटिनम आणि टायटेनियम प्लॅन वाल्या ग्रहाकांना जिओ फर्स्ट डे फर्स्ट शो मुव्ही सर्व्हीसेजचाही फायदा मिळणार आहे.

Visit : Policenama.com 

You might also like