Jio Fiber : फ्री LED TV मिळणार पण ‘या’ अटीवर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओची फायबर सर्विस सुरु होण्यास आता फक्त काही दिवस शुल्लक आहे. 5 सप्टेंबरपासून जिओ फायबर देशभरात सुरु करण्यात येईल. जिओने आपल्या ग्राहकांना 700 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतचे दर ठरवले आहेत. परंतू ग्राहकांना सर्वात अधिक अतुरता आहे ती ‘फ्री’ LED टीव्ही आणि 4K रिजॉल्यूशन असलेल्या सेट टॉप बॉक्सची. याशिवाय फायबर सर्विसचा कमीतकमी 100 Mbps चा स्पीड असणार आहे.

वेलकम ऑफर आणि फ्री टीव्ही –
फायबर सर्विसमध्ये LED टीव्ही फक्त वेलकम ऑफरमध्येच मिळणार आहे. यासह ग्राहकांना 4K रिजॉल्युशन असलेला सेटटॉप बॉक्सची ऑफर देण्यात येणार आहे. याशिवाय फ्री LED घेतल्यानंतर यूजर्सला जिओ फायबरचा वार्षिक पॅकचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. या पॅकचे Jio Forever असे नाव आहे.

जिओचे हे सर्व प्लॅन 5 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे ग्राहकांना LED घेण्यासाठी जिओ फायबरचा वार्षिक प्लॅन घ्यावा लागणार आहे. म्हणजेच हा टीव्ही फ्री नसून त्यासाठी थोडी थोडकी का होईना किंमत मोजावी लागणार आहे.

जिओ यासह द टॉप व्हिडिओ सेवेची सुविधा देखील देणार आहे. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कंटेंट उपलब्ध होईल. या सेवासाठी अतिरिक्त किंमत मोजावी लागणार की नाही याची माहिती रिलायन्सकडून अजून देण्यात आली नाही.

आरोग्यविषयक वृत्त