रिलायसन्सचा मोठा धमाका ! 2 महिन्यांसाठी ‘एकदम’ फ्री राहणार Jio फायबर सेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा ‘जिओ फायबर’ 5 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. ही सेवा केवळ ब्रॉडबँड इंटरनेटसाठीच नाही तर फिक्स्ड लाइन टेलिफोन आणि टेलिव्हिजन सेट – टॉप साठी सुद्धा आहे. एवढेच नाही तर रिलायन्स पहिल्या दोन महिन्यांसाठी ही सुविधा खास ऑफर अंतर्गत विनामूल्य देऊ शकते. तसेच, जिओ फायबरच्या जुन्या ग्राहकांना हा लाभ मिळेल. जिओ फायबरच्या सहाय्याने ही कंपनी वापरकर्त्यांना 100 एमबीपीएस ते 1 जीबीपीएस पर्यंत स्पीड देणार आहे.

आधीच्या ग्राहकांसाठी मोफत असेल या सुविधा –

या खास ऑफरमध्ये, कंपनी कमीतकमी पहिल्या दोन महिन्यांत सर्व जुन्या फायबर ग्राहकांना विनामूल्य Jio Fiber सेवा देणार आहे. याचा अर्थ असा आहे की जिओ फायबरच्या व्यावसायिक लाँचिंगनंतर विद्यमान जिओ फायबर-टू-होम ग्राहकांनी होम ब्रॉडबँड सेवा वापरल्यास त्यांना पैसे देण्याची गरज भासणार नाही. इतकेच नाही तर हे वापरकर्ते कनेक्शनच्या वेळी दिलेले 2,500 रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट परत करू शकतात. कंपनीने परताव्यासाठीचे या वापरकर्त्यांसाठी कोणतेही बंधन निश्चित केलेले नाही.

1,500 रुपयांचे डिपॉझिट –

5 सप्टेंबर रोजी लाँच झाल्यानंतर जियो फायबरची सदस्यता घेतलेल्या ग्राहकांना 1,500 रुपयांचे सुरक्षा डिपॉझिट आकारले जाईल जे की रिफंडेबल असेल. कंपनी जियो फायबरसाठी इन्स्टॉलेशन चार्ज म्हणून एक हजार रुपये घेईल.

700 रुपयांपासून सुरु होईल प्लॅन –

जिओ फायबरची योजना 700 रुपयांपासून सुरू होईल. त्याचबरोबर त्याची सर्वात प्रीमियम योजना दरमहा 10,000 रुपये असेल. जियो फायबरच्या सदस्यांना कनेक्शनसह लँडलाइनमधून देशभरात विनामूल्य कॉलिंग लाभ मिळेल.

फस्ट डे फस्ट शो पाहू शकतील ग्राहक –

जिओ फायबरच्या वेलकम ऑफरअंतर्गत कंपनी ग्राहकांना 4 के एलईडी टीव्हीसह 4 के विनामूल्य सेट टॉप बॉक्स देईल. यासह कंपनीने आपल्या वार्षिक बैठकीत सांगितले की जिओ फायबरच्या प्रीमियम ग्राहकांना फर्स्ट डे फर्स्ट शो हा नवीन चित्रपट पाहण्याची संधी मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –