जिओचा ‘हा’ आहे नवा ‘स्वस्त आणि मस्त’ प्लॅन

मुंबई : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने जिओ गिगा फायबर या ब्रॉडबँड इंटरनेट सेवा एक नव्या प्लॅनसह कमी डिपॉजिटमध्ये बाजारात आणली आहे. नव्या पॅकेज नुसार 2500 रुपये इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून ठेवावी लागेल. मागील वर्षी सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून 4500 रुपये रक्कम जमा ठेवावी लागेल अशी घोषणा करण्यात आली होती.

या ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनल सेेवेत ना की फक्त सेवेची किंमत कमी करण्यात आली आहे तर त्याचा स्पीड देखील 100Mbps वरुन 50 Mbps करण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यासोबत देण्यात आलेल्या राउटर मध्ये देखील बदल करण्यात आला आहे. त्यात डुवेल बँड कनेक्टिविटीच्या जागी सिंगल बँड सपोर्ट देण्यात आला आहे.

2500 च्या प्लॅन मध्ये मिळणारे फायदे –
जिओ यात सिंगल बॅड राउटर उपलब्ध करुन देणार असून 50 Mbps ची स्पीड लिमिट देणार आहे. यात प्रत्येक महिन्याला 100 GB मोफत डाटा उपलब्ध करुन देण्यात येईल. जिओ युजर्सला अपेक्षा आहे की जिओ लवकरच हा प्लॅन उपलब्ध करुन देईल.

जिओ गिगा फायबर ही ऑप्टिकल बेस्ट होम ब्रॉडबँड सेवा आहे. गिगा फायबर FTTH ह्या दोन सेवेसोबत बाजारात दाखल होईल. एक असेल जिओ गीगा फायबर राउटर आणि दुसरे असेल जिओ गिगा टीव्ही सेट टॉप बॉक्स. याला 1400 शहरांमध्ये लॉन्च देखील केले गेले आहे.

पहिल्यांदा जिओने जाहीर केलेल्या गिगा फायबर सेवेत 100 Mbps च्या स्पीड मध्ये 100 GB डेटा देण्यात येईल. परंतू कंपनीने आता स्वस्त प्लॅन घोषित केला आहे. ज्यात युजर्सला कमी डिपॉजिट ठेवावे लागेल आणि सेवेचा लाभ घेता येईल.