खुशखबर ! रिलायन्स Jio ची नवी ‘ऑफर’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने एक खुशखबर दिली आहे. येत्या १२ तारखेला होणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी हे रिलायन्स जिओच्या गिगाफायबरच्या लॉंचची घोषणा करतील अशी शक्यता आहे. या सेवेमुळे देशातील स्मार्ट होम इंटनेट ऑफ थिंग्स, ब्रॉडबॅंड, मनोरंजन या ब्रॉडबॅंडच्या बाजारपेठेत मोठे बदल घडवून येतील. ही माहिती एका इंग्रजी संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा तिमाही निकाल जाहीर केला. यावेळी अंबानी यांनी जिओ गिगाफायबर सेवांच्या बीटा चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची आणि स्मार्ट होम सोल्युशन्सचे संपूर्ण पॅकेज ५ कोटी घरांपर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते. यामुळे गिगाफायबरच्या लॉंचच्या संदर्भात अनेक चर्चा रंगत आहेत. भारतात अनेक ठिकाणी वायरलेस नेटवर्क आले नाही. त्यामुळे त्यांची खूप अडचण होत होती. पण आता गिगाफायबरच्या माध्यमातून भारतातील ५ कोटी घरापर्यंत हे नेटवर्क पोहचेल असे अंबानी यांनी सांगितले.

दरम्यान गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ गिगाफायबरची मोठी घोषणा केली होती. यानंतर कंपनीने ११०० शहरात गिगाफायबरच्या नोंदणीला सुरुवात केली. त्यामुळे आता जिओने टेलिकॉम क्षेत्रात झालेल्या बदलांप्रमाणेच ब्रॉडबॅंडच्या बाजारपेठेतही मोठे वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

गिगाफायबरच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या ऑफरमध्ये ग्राहकांना ब्रॉडबॅंड, आयपीटीव्ही आणि लॅंडलाईन कनेक्शनचे कॉम्बिनेशन हे फक्त ६०० रुपयांत मिळू शकते. तसेच १०० जीबी डेटाही मिळू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त