Jio Haptik Technologies | 300% च्या वेगाने वाढतेय मुकेश अंबानी यांची ‘ही’ छोटी कंपनी, व्हॉट्सअप सुद्धा आहे पार्टनर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Haptik Technologies | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कंपन्या सातत्याने प्रगती करत आहेत. रिलायन्स समूहाशी (Reliance Group) संबंधीत जवळपास सर्व कंपन्या वेगाने वाढत आहेत. याच कंपन्यांपैकी एक नाव जिओ हॅप्टिक (Jio Haptik Technologies) आहे. ही छोटी कंपनीसुद्धा वार्षिक 300 टक्केच्या वेगाने वाढत आहे. फेसबुक (Facebook) ची व्हॉट्सअप (WhatsApp) सुद्धा हॅप्टिकची पार्टनर आहे.

 

AI क्षेत्रात काम करते Jio Haptik
जिओ हॅप्टिक टेक्नॉलॉजीस रिलायन्सची जिओ प्लॅटफॉर्म्स (Jio Platforms) साठी कन्व्हर्सेशनल एआय बनवते. हॅप्टिक सध्या व्हाट्सअपसोबत मिळून ई-कॉमर्सशी संबंधीत एआय चॅटबोट बनवत आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये ड्रीम11 (Dream11), ओयो रूम (OYO Room), लेन्सकार्ट (Lenskart), ओला कॅब (Ola Cab), पेपरफ्राय (Pepperfry), अपस्टॉक्स (Upstox), हॅवेल्स (Havells), सिएट (CEAT), यूरेका फोर्ब्ज (Eureka Forbes) सारख्या नावांचा समावेश आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली सब्सिडियरी रिलायन्स जिओ डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे हॅप्टिक इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडची 87 टक्के भागीदारी दोन वर्षापूर्वी खरेदी केली होती. रिलायन्सने हा सौदा 700 कोटी रुपयांत केला होता. यानंतर संयुक्त कंपनीचे नाव बदलून जिओ हॅप्टिक टेक्नॉलॉजीस लिमिटेड (Jio Haptik Technologies) करण्यात आले.

 

रिलायन्स जिओने व्हॉट्सअप चॅटबोटद्वारे अनेक सुविधा याच वर्षी जूनमध्ये सुरू केल्या आहेत.
व्हॉट्सअप चॅटबोटचा वापर वाढत असून येथे कंपनीचे 34 कोटी यूजर आहेत. जे रोज 100 अरब मेसेज आदान-प्रदान करतात.

 

Web Title :- Jio Haptik Technologies | jio haptik technologies of mukesh ambani rising 300 percent yoy facebook whatsapp among partners

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Esha Gupta | बाल्कनीत उभं राहून ‘या’ नायिकेनं केलं टॉपलेस फोटोशूट; पाहा व्हायरल फोटो !

Ruturaj Gaikwad | ऋतुराजच्या पराक्रमी खेळीमुळे चाहत्यांनी केलं सायलीला कमेंट्स; म्हणाले – ‘आज तुमचे हे चांगले खेळले’

Nusrat Jahan Marriage | …अन् नुसरत जहॉंनं दिली प्रेमाची कबूली ! फोटो शेअर करत म्हणाली, झालं दुसरं लग्न..

Ratan Tata Love Story | बिझनेसमध्ये यशस्वी ठरलेल्या रतन टाटा यांनी का केला नाही विवाह, कसे तुटले होते प्रेयसीसोबतचे नाते? जाणून घ्या