Reliance Jio नं सादर केले cricket pack रिचार्ज प्लॅन, प्रत्येक क्रिकेट मॅचची पाहू शकाल Live स्ट्रीमिंग

पोलिसनामा ऑनलाइन – Reliance jio ने दोन प्री-पेड प्लान सादर केल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांना डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही प्लान सुरू केल्या आहेत. या नवीन प्लानमध्ये जिओ प्री-पेड यूजर्सना Disney+ Hotstar ची एक वर्षासाठी सब्सक्रिप्शन मिळेल. तसेच, इतर डेटा लाभ ही उपलब्ध असतील.

401 रुपयांच्या रिचार्जची योजना

Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन देणारे हे पहिले प्री-पेड प्लान आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, जिओच्या 401 रुपयांच्या प्लानला 28 दिवसांची वैधता (वैलिडिटी) मिळेल आणि 3 जीबी डेटा दररोज उपलब्ध केला जाईल. या व्यतिरिक्त जर आपण 3 जीबी डेटा वापरत असाल तर 6 जीबी चा अतिरिक्त डेटा कंपनीकडून दिला जाईल. हा प्लान विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी असेल जे दररोज बर्‍याच डेटाचा वापर करतात.

499 रुपये रिचार्ज योजना

499 रुपयांच्या क्रिकेट पॅकमध्ये एक वर्षासाठी Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन ऑफर करण्यात येत आहे. रिचार्ज पॅकशिवाय Disney+ Hotstar ची एक वर्षाचे सबस्क्रिप्शन 399 रुपयांमध्ये येते. Jio वेबसाइटनुसार या प्लान मध्ये अनलिमिटेड क्रिकेट कवरेट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सब्सक्रिप्शन बेनिफिट्स वगळल्यास 499 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध होईल. या प्लानची वैधता 56 दिवसांची असेल. परंतु, या पॅकमध्ये कोणतीही व्हॉईस आणि SMS ची सुविधा दिली जाणार नाही.

777 रुपये रिचार्ज योजना

777 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये एक वर्षाची Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध असेल. पण 499 रुपयांच्या प्लानविरूध्द जिओ यूजर्सना यामध्ये व्हॉईस आणि डेटा बेनिफिट्स देण्यात येतील. ही तिमाही योजना असेल, ज्यामध्ये 131 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि Jio Apps चा एक्सेस देण्यात येईल. या प्लानची वैधता 84 दिवसांची असेल. प्लानतंर्गत दररोज 1.5 GB डेटा देण्यात येणार असून या व्यतिरिक्त 5 GB डेटा अतिरिक्त उपलब्ध होईल.

2,599 रुपये रिचार्ज योजना

2,599 रुपये रिचार्ज प्लान जास्तीत जास्त 365 दिवसांच्या वैलिडिटीसह येईल. या योजनेत दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध असेल. तसेच 2GB डेटा संपल्यानंतर एकूण 10 GB डेटा ऑफर केला जाईल.