Jio कडून Wi-Fi कॉलिंग लॉन्च, एकदम ‘फ्री’मध्ये भरपूर बोलू शकता, असा करा वापर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी व्हॉईस ओव्हर वायफाय कॉलिंग सर्व्हीस लाँच केली आहे. ही सेवा देशातील सर्वच सर्कलसाठी लाँच केली आहे. आता वायफाय नेटवर्कवरून जिओ ग्राहक मोफत कॉलिंग करू शकतात. कंपनीने ही सेवा दिल्ली एनसीआर आणि चेन्नई सर्कलमध्ये लाँच केली होती. परंतु 16 जानेवारी पर्यंत ही सेवा पूर्ण देशात सुरू केली जाणार आहे. 150 हून अधिक स्मार्टफोन जिओच्या या सेवेला सपोर्ट करतील. सध्या देशात जिओ आणि एअरटेलच ही सुविधा देत आहे. जिओच्याही आधी एअरटेलने ही सुविधा सुरू केली आहे.

रिलायन्स जिओच्या व्हीओ वायफाय कॉलिंग सेवेचे फायदे-
1) ग्राहक या सेवेचा लाभ घरातील वायफाय कनेक्शन किंवा पब्लिक वायफाय हॉटस्पॉटवरूनही घेऊ शकतात.

2) यामुळे ग्राहकांना कॉलिंग सर्व्हीसमध्ये सुधारणा जाणवणार आहे.

3) या सेवेतून ग्राहक व्हिडिओ कॉलही करू शकणार.

4) ग्राहकांना या सेवेसाठी कोणतेही अतिरीक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
Jio
जिओ VoWiFi ची इतर माहिती
यासाठी ग्राहकांना वेगळं अ‍ॅप किंवा लॉगइनची गरज नाही. घरातील वायफायद्वारे याचा लाभ घेतला जाऊ शकतो. ही सेवा देशातील सर्वच सर्कलमध्ये लाँच केली जाणार आहे जी ग्राहकांसाठी आनंदाची बाब आहे.

VoWiFi आहे तरी काय ?
व्हॉईस ओव्हर वायफाय किंवा व्हिओ वायफाय हे वायफायद्वारे काम करतं. याला व्हॉईसओव्हर आयपी (VoIP) असंही म्हटलं जातं. व्हिओ वायफाय द्वारे तुम्ही होम, पब्लिक किंवा कोणत्याही वायफायच्या हॉटस्पॉटच्या मदतीने कॉलिंग करू शकता. जरी तुमच्या मोबाईलला रेंज नसेल तरीही तुम्ही वायफाय हॉटस्पॉटवरुन आराम कॉल करू शकता. याचा सर्वाधिक फायदा रोमिंगमध्ये होतो. कारण तुम्ही फ्रीमध्ये बोलू शकता.

कसा कराल कॉल ?
मोबाईल नेटवर्कशिवाय केल्या जाणाऱ्या कॉलिंगला VoWiFi कॉलिंग म्हटलं जातं. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर जसं एखाद्याशी कॉलवर बोलता अगदी तसंच काहीसं हे आहे. यासाठी तुमचा स्मार्टफोन वायफाय कॉलिंगला सपोर्ट करणार असावा.

VoWiFi साठी अशी करा सेटींग
VoWiFi ही सुविधा तुमच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे किंवा नाही हे तुम्ही नेटवर्क सेटींगमध्ये चेक करू शकता. जर त्यात वायफाय कॉलिंगचा पर्याय असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. कोण-कोणत्या स्मार्टफोनमध्ये जिओ वायफाय कॉलिंग सपोर्ट आहे हे तपासण्यासाठी तुम्ही Jio.wificalling या वेबसाईटवर भेट देऊ शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/