JioFiber नं केले 2 ‘स्वस्त’ प्लॅन लॉन्च, मिळणार 10 Mbps पासुन 100 Mbps पर्यंतची ‘स्पीड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओ ने जिओ फायबरसाठी आणखी एक नवा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅन नंतर आता Jio Fiber FTTH प्लॅनची सुरुवातीची किंमत 351 रुपये झाली आहे. असे वाटत होते की जिओ सिम प्रमाणेच फायबर इंटरनेट क्षेत्रात धमका उडवून देईल, परंतू असे काही झाले नाही. जिओ फायबरचे प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत महाग आहेत आणि कदाचित या कारणाने जिओ फायबरला जिओ सिम प्रमाणे वेग मिळणार नाही. कंपनीने अनेक आकर्षित प्लॅन लॉन्च केले होते, ज्या बरोबर फ्री टीव्ही आणि राऊटर देखील मिळणार होता. या प्लॅन बरोबर कंपनीने 199 रुपयांचा आठवड्याभराचा प्लॅन देखील सादर केला होता.

कंपनीचा आणखी एक प्लॅन आहे तो 351 रुपयांचा. हा जिओ फायबरचा सर्वात स्वस्त प्लॅन असेल. याअंतर्गत कंपनी या यूजर्सला टार्गेट करत आहे ज्यांना स्पीड नाही, फक्त कनेक्टिविटीची जास्त गरज आहे. या प्लॅन अंतर्गत यूजर्सला 50 जीबी डाटा देण्यात येईल.

351 रुपयांच्या प्लॅन –
351 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 10 एमबीपीएसची स्पीड मिळेल. या प्लॅन बरोबर FUP आहे. म्हणजेच 50 जीबी डाटा संपल्यावर 1Mbps चा स्पीड मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध असेल.

199 रुपयांचा प्लॅन –
199 च्या प्लॅनमध्ये 100 Mbps चा स्पीड मिळेल, परंतू येथे देखील FUP आहे, ज्यानंतर 1 Mbps चा स्पीड मिळेल. याची वैधता 7 दिवस असेल. जीएसटीनंतर 351 रुपयांचा प्लॅन 414 रुपयांना मिळेल.

याआधी Jio Fiber चा प्लॅन 699 रुपयांपासून सुरु होत होते. हे नवे प्लॅन प्रीपेड आहेत आणि दोन्ही प्लॅन बरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि टीव्हीची सेवा देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com