Jio नं लाँच केला ‘क्रिकेट धन धना धन’ प्लॅन, Disney+Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने क्रिकेट धन धना धन प्लॅन सुरू केला आहे. या प्लॅननुसार सर्व क्रिकेट सामने थेट पाहिले जाऊ शकतात. क्रिकेट चाहत्यांना डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन सुरू करण्यात आला असून त्यासोबत डेटादेखील देण्यात येणार आहे.

499 रुपयांचा प्लॅन

499 रुपयांच्या क्रिकेट प्लॅनमध्ये एक वर्षासाठी Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन देण्यात येईल. याशिवाय या पॅकमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येईल. हे संपूर्ण क्रिकेट हंगाम म्हणजेच 56 दिवसांसाठी वैध असेल.

777 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar VIP चे सब्स्क्रिप्शन दिले जाईल. हा तिमाही प्लॅन आहे आणि त्याची वैधता 84 दिवसांसाठी आहे. 777 रुपयांच्या या प्लॅनमध्ये एकूण 131 जीबी डेटा मिळेल. यासह अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देखील देण्यात येईल. कंपनीने असे म्हटले आहे की या प्लॅनसोबत जिओ अ‍ॅपचे अ‍ॅक्सेस देखील मिळेल. याची वैधता 84 दिवसांसाठी आहे.

या दोन प्लॅन्सव्यतिरिक्त जिओचे हे प्लॅन देखील क्रिकेटसाठी आहेत

401 रुपयांच्या प्लॅनची वैधता 1 महिन्याची असून त्यात 90 जीबी डेटा देण्यात येणार आहे. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग येत नाही. त्याचप्रमाणे 2599 रुपयांचाही प्लॅन आहे त्यात डेटा 740 जीबी येतो आणि त्याची वैधता एक वर्षाची आहे. तसेच 612 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 72 जीबी डेटा आणि 6000 मिनिट जिओ ते नॉन-जिओ कॉलिंग मिळेल. त्याशिवाय 1,004 रुपयांचा डेटा अ‍ॅड पॅक आहे ज्यात 200 जीबी डेटा मिळतो आणि त्याची वैधता 180 दिवस आहे.