Jio चे 3 प्लॅन ! 336 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने प्रीपेड यूजर्ससाठी तीन नवे ऑल इन वन प्लॅन्स सुरू केले आहेत. हे प्लॅन्स घेतल्यानंतर प्रीपेड यूजर्सला आता प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. कारण रिलायन्स जिओचे हे सर्व प्लॅन 336 दिवस व्हॅलिड राहतील. रिलायन्स जिओचे ऑल इन वन प्रीपेड प्लॅन्स 1,001 रुपये, 1,301 रुपये आणि 1,501 रुपयात उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये प्रीपेड यूजर्सना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल, सोबत अनलिमिटेड ऑन नेट कॉलिंगचा फायदा मिळेल. रिलायन्स जिओच्या या तीन प्लॅन्सबाबत जाणून घेवूयात…

रिलायन्स जिओचा 1,001 रुपयांचा प्लॅन
जिओ फोनच्या 1,001 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसचा बेनिफिट मिळेल. यासोबत पूर्ण वर्षासाठी 49जीबीचा 4जी डेटा मिळेल. ज्याची डेली लिमिट 150एमबी असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सला नॉन-जिओ नंबरसाठी 12,000 मिनिटांचा एफयूपी लिमिट मिळेल. तर या प्लॅनची व्हॅलिडिटी 336 दिवसांची आहे.

रिलायन्स जिओचा 1,301 रुपयांचा प्लॅन
जिओ फोनच्या 1,301 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रीपेड यूजर्सला एक वर्षासाठी 164जीबीचा 4जी डेटा रोज 500एमबी लिमिटसह डेटा मिळेल. तर यूजर्सला या प्लॅनमध्ये नॉन-जिओ नंबरसाठी 12,000 मिनिटचा एफयूपी आणि 100 फ्री एसएमएसचा फायदा मिळेल. हा प्लॅन सुद्धा 336 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येतो.

रिलायन्स जिओचा 1,501 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये रोज 1.5जीबी डेटा मिळेल. म्हणजे 336 दिवसाठी यूजर्सला एकुण 504जीबी डेटा मिळेल. यामध्ये अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंगसह नॉन-जिओ नेटवर्कसाठी 12,000 मिनिटची एफयूपी लिमिट असेल. यूजर्सला 100 एसएमएस मिळतील.