‘Jio’ चा भन्नाट ‘प्लॅन’, फक्त 255 रूपयांमध्ये दिली 84 दिवसांची धमाकेदार ‘ऑफर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio आपल्या खास प्लॅन ऑफरसाठी प्रसिद्ध आहे. जिओ आपल्या प्रीपेड प्लॉनवर मोठ्या प्रमाणात खास ऑफर ग्राहकांना उपलब्ध करुन देते. नुकतीच जिओने 26 जानेवारीला आपल्या ग्राहकांना खास ऑफर उपलब्ध करुन दिली ज्यामुळे ग्राहकांच्या या ऑफरवर उड्या पडल्या.

जिओने ग्राहकांचा पसंतीचा प्लॅन असलेला 84 दिवसांच्या वैधतेच्या 555 रुपयांच्या प्लॅनवर 300 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध करुन दिली आहे. जिओने रिचार्ज ॲप ‘फोन पे’ वरुन ग्राहकांना ही खास ऑफर उपलब्ध करुन दिली. जर ‘फोन पे’ वरुन जिओचा 555 रुपयांचे रिचार्ज केले तर ग्राहकांना 300 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ज्यात 555 रुपयांचा रिचार्ज प्लॅनसाठी तुम्हाला फक्त 255 रुपये द्यावे लागतील.

जिओच्या 84 दिवसांच्या वैधता असलेल्या प्लॅनची किंमत 555 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधतेसह 1.5 जीबी डाटा मिळेल तसेच जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिट मिळतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध होईल. जिओचा हा खास 84 दिवसांचा प्लॅन जिओ यूजर्समध्ये पसंतीचा आहे.