WhatsApp वर लॉन्च झालं JioMart, अशी करू शकता ‘ऑर्डर’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – अलीकडेच फेसबुकने रिलायन्समध्ये मोठ्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. फेसबुक आणि रिलायन्स यांच्यातील या कराराअंतर्गत व्हॉट्सअ‍ॅप आणि रिलायन्स जिओ यांच्यातही एक व्यावसायिक करार झाला आहे. हे JioMart या ऑनलाइन व्हेंचरसाठी आहे.

रिपोर्टनुसार, JioMart आता ट्रायलच्या आधारे लाँच करण्यात येत आहे. रिलायन्स रिटेलचा हा ई-कॉमर्स उपक्रम असेल आणि सुरुवातीला तो मुंबईत सुरू केला जात आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू असून अशा परिस्थितीत रिलायन्सच्या जिओ मार्टचा फायदा होईल. एवढेच नाही तर जिओमार्ट हे व्हॉट्सअ‍ॅपवर आधारित ऑनलाइन पोर्टल आहे, त्यामुळे रिलायन्सला व्हॉट्सअ‍ॅपच्या युजर बेसचा फायदा देखील मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात ४०० मिलियन युजर्स आहेत आणि लॉकडाऊन दरम्यान हा करार फायनल झाला आहे आणि याला अलीकडेच सुरू केले जात आहे.

माहितीनुसार, रिलायन्स हे इतर राज्यांतही सुरुवात करू शकते आणि जिओ मार्ट पुढे नेण्यात व्हॉट्सअ‍ॅप महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

JioMart वापरण्यासाठी ग्राहकांना प्रथम त्यांच्या मोबाईलवर 8850008000 नंबर सेव्ह करावा लागेल. जिओ मार्टकडून ग्राहकांना एक लिंक देण्यात येईल जिथून ऑर्डर केली जाऊ शकते.