‘लॉकडाऊन’च्या काळात Jio ग्राहकांना देणार ‘आधार’ ! ‘वैधता’ वाढविण्यासह देणार 100 मिनट अन् शंभर SMS ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओचे ग्राहक खरेतर स्वतः साठी, घरच्यांकरिता आणि मित्रांकरिता ऑनलाईन रिचार्ज करतात. पण लॉकडाऊनच्या कठीण काळात रिटेल दुकानातून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिओने रिचार्ज करण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात UPI, ATM, SMS, Call यांचा समावेश आहे.

परंतु हे सर्व पर्याय असूनही, असे दिसून आले आहे की या कठीण काळात, JioPhone च्या ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि ते रिचार्ज करु शकत नाहीत. हे पाहता जिओने एक खास ऑफर सादर करून जिओफोनच्या वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे.

कंपनीने जिओफोनसाठी अनेक फायदे सादर केले आहेत. जिओने देशभरातील लाखो जिओफोन ग्राहकांना कॉलसाठी 100 मिनिटे आणि 100 एसएमएस विनामूल्य देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याची वैधता 17 एप्रिल 2020 पर्यंत असेल आणि त्यानंतरही येणारा कॉल चालू राहील.

कोरोना विषाणूविरूद्ध मोहीम
देशात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाशी लढण्यासाठी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड ने #CoronaHaaregaIndiaJeetega या नावाने मोहीम देखील सुरु केली आहे. देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये कामासाठी गेलेले बरेच लोक स्वतःच्या गावी परतत आहेत अशातच जिओच्या ग्राहकांना आपल्या लोकांशी सतत जोडून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. याशिवाय रिलायंस जिओ ने MyJio App मध्ये खूप सारे असे फीचर्स जोडले आहेत ज्याद्वारे आपण स्वतः व्हायरसची लक्षणे सहज तपासू शकता.