Jio कडून ग्राहकांना 30 मिनीट कॉलिंग एकदम फ्री, असं तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केल्यावर आता जिओ धारकांना प्रति मिनिट सहा पैसे मोजावे लागणार आहेत त्यानंतर आता कंपनीने ग्राहकांना दिलासा देणारी एक नवीन बातमी दिली आहे. जिओ सध्या काही ग्राहकांना तीस मिनिटांपर्यंत फ्री कॉलिंग देत आहे. याबाबतची माहिती ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून दिली जात आहे.

जे ग्राहक पहिल्यांदा रिचार्ज करत आहेत त्यांनाच ही ऑफर दिली जात आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जिओची ही ऑफर 17 ऑक्टोबर 2019 पर्यंतच आहे मात्र जिओ ने अधिकृतरीत्या या बाबत अजून काही माहिती दिलेली नाही.

आययूसी दराच्या वाढीनंतर ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न
9 ऑक्टोबर रोजी जिओने घोषणा केली होती की आता जिओ व्यतिरिक्त अन्य कंपन्यांना कॉल करण्यासाठी एक्सट्रा रिचार्ज करावे लागणार आहे. कंपनीने याला IUC चार्ज असे नाव दिले आहे.

म्हणजेच आता दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना दहा रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. या रिचार्ज अंतर्गत 124 मिनिटांचे कॉलिंग दिले जाणार आहे ज्याचा वापर इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे या बदल्यात कंपनी ग्राहकांना एक जीबी इंटरनेट डेटा देखील देणार आहे.

Visit : policenama.com