ना मिनिमम बॅलन्सचे झंझट, ना लागणार चार्ज ! जाणून घ्या कसे उघडायचे Jio Payments Bank Account आणि काय आहेत याचे फायदे?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Payments Bank Account | रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे, ज्यामध्ये येजरची संख्या इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जास्त आहे. रिलायन्स जिओच्या वतीने ग्राहकांना कॉलिंग, हाय स्पीड डेटा, लोकल, एसटीडी आणि आयएसडी सारख्या सुविधा पुरवल्या जातात. (Jio Payments Bank Account)
यासोबतच जिओ आपल्या प्लॅनवर OTT सबस्क्रिप्शन देखील देत आहे. यासोबतच जिओकडून पेमेंट बँक खात्याची सेवाही दिली जाते. येथे मिनिमम बॅलन्स राखण्याची गरज नाही आणि कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
Jio Payments Bank Account काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या.
1. काय आहे जिओ पेमेंट बँक
जिओ पेमेंट बँक ही व्हर्च्युअल बँक आहे, जी फोनवरून घरून किंवा कोठूनही नियंत्रित केली जाऊ शकते. जिओ नंबर नसला तरीही त्यात खाते उघडू शकता. यामध्ये खाते उघडल्यास मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. यामध्ये खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही. केवळ मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आवश्यक आहे.
2. काय आहेत फायदे
जर जिओ पेमेंट बँकेत खाते उघडायचे असेल तर आधी त्याचे फायदे जाणून घ्या. यामध्ये 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. यामध्ये इतर बँकांप्रमाणे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. खाते सक्रिय नसल्यास ते उघडण्यासाठी कोणताही दंड नाही.
याच्या मदतीने तुम्ही UPI किंवा ऑनलाइन पेमेंट्स माध्यमांना लिंक करून ऑनलाइन व्यवहार करू शकता. याशिवाय वन क्लिकवर बिल पेमेंट देखील करू शकता. जिओ पेमेंट बँकेकडून 4 टक्के व्याज देखील मिळते.
3. जिओ पेमेंट बँक खाते कसे उघडायचे
जिओ पेमेंट बँक खाते उघडण्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही MyJio अॅपद्वारे खाते उघडू शकता. यासाठी आधार क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक आवश्यक असेल. या तपशीलांची पडताळणी ओटीपीद्वारे केली जाते. हा ओटीपी आधारशी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.
4. किती सुरक्षित आहे जिओ पेमेंट्स बँक खाते
जिओ पेमेंट्स बँक खात्यात प्रवेश करण्यासाठी पासवर्ड आणि mPIN आवश्यकता असल्याने अनधिकृत प्रवेशापासून सुरक्षित आहे.
कोणत्याही आउटलेटवर व्यवहार करत असल्यास, फिंगरप्रिंटचा वापर करून प्रमाणीकरण करावे लागेल,
ज्यामुळे खात्यात कोणत्याही अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध होईल.
IT सिस्टम PCI DSS च्या अनुरूप आहे, ज्यामुळे डेटा सुरक्षित असल्याची खात्री होते.
दुसरीकडे, जर फोन हरवला असेल, तर पैसे जिओ पेमेंट्स बँकेकडे सुरक्षित राहतील.
कारण फक्त बायोमेट्रिक किंवा एम-पिन तपशीलांद्वारे खात्यात प्रवेश करू शकता.
याशिवाय नंबर आणि खाते क्रमांक कुणाला माहीत असला तरी पैसे काढता येणार नाहीत.
5. अशी करू शकता तक्रार
तक्रार नोंदवायची असेल किंवा कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असेल तर 18008919999 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.
अशाप्रकारच्या पर्यायांसह Airtel Payments Bank Ltd, India Post Payments Bank Ltd, FINO Payments Bank Ltd, Paytm Payments Bank Ltd, NSDL Payments Bank Ltd सारख्या कंपन्या देखील असे पर्याय देतात.
Web Title :- Jio Payments Bank Account | how to open jio payments bank account online know benefit and security
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Anti Corruption Bureau Thane | 1500 रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
BJP MLA Nitesh Rane | शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; उद्या न्यायालयात सुनावणी