Jio Phone च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! खास अ‍ॅप लॉन्च, हजारोंची बक्षिसं जिंकण्याची संधी

नवी दिल्ली :वृत्त संस्था – रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना सतत नवनवीन फीचर्स देण्यासाठी आग्रक्रमी असते. आता जिओने आपल्या Jio Phone वापरकर्त्यांना क्रिकेटबाबत माहिती मिळण्यासाठी JioCricket नावाचे अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्ता लाईव्ह स्कोर, मॅच अपडेट्स आणि क्रिकेट जगतातील बातम्या व्हिडीओ पाहू शकेल.

या जिओ फोनमध्ये Jio Cricket अ‍ॅप साठी ९ भाषांचा उपयोग करण्यात आला आहे. त्यात इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तेलगू, तामिळ या भाषांचा उपयोग वापरकर्त्यांना करता येणार आहे. Jio Cricket Play Along गेम या अ‍ॅप मध्ये देण्यात आलं असून, ते हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. वापरकर्ते ते Jio Store वरुन डाउनलोड करु शकतील.

JioCricket अ‍ॅप सुरु करण्यामागे जिओ फोन वापरकर्त्यांना क्रिकेट जगतातील छोट्या-मोठ्या लाईव्ह उपडेट देण्याचा मुख्य उद्देश आहे. वापरकर्त्यांना या अ‍ॅप मध्ये लाईव्ह स्कोरसोबत विविध व्हिडीओ, आगामी प्लेअर पिक्स्चर पाहण्यासारखे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

तद्वतच, या अ‍ॅप मध्ये अजून एक पर्याय देण्यात आला आहे, ज्यामध्ये वापरकर्ते मॅच अपडेट्सचं पूर्वानुमान लावू शकतात. त्यामध्ये ५०००० रुपयांपर्यंत रिलायन्स व्हायचर्स जिंकण्याची संधी वापरकर्त्यांना मिळणार आहे. JioCricket अ‍ॅप च्या होमपेजवर हे गेम सेक्शनमध्ये देण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like