‘रिलायन्स’नं आणलं Zoom सारखं JioMeet अ‍ॅप, एकाच वेळी 100 लोकांशी बोलू शकाल

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मने आज आपले व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप JioMeet लाँच केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले आणि आयफोन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या व्हिडिओ कॉल अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची क्वालिटी एचडी (HD) असेल आणि 100 लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल करू शकतात. JioMeet पुढील एक महिन्यासाठी वापरकर्त्यांच्या फोनमधील बीटा व्हर्जनवर चालू होईल.

आज हे अँड्रॉइड आणि अ‍ॅपल या दोन्हीसाठी लाँच केले गेले आहे. या अ‍ॅपवर 100 लोक एकाच वेळी कॉन्फरन्स घेऊ शकतात. कॉल सुरू करण्यासाठी त्यास कोणताही कोड किंवा इन्व्हाईट्स ची आवश्यकता नसते. ज्यांना डेस्कटॉपवरून हे अ‍ॅप वापरायचे आहे त्यांना JioMeet च्या इन्व्हाईट लिंकवर क्लिक करावे लागेल. यासाठी त्यांना अ‍ॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.

इतर फीचर्स कोणती ?

या अ‍ॅपमध्ये काही इतर फीचर देखील आहेत. जसे आपण आपल्या मीटिंगचे वेळापत्रक तयार करू शकता, एकमेकांशी स्क्रीन शेअर करू शकता. हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म गूगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्सवर देखील वापरला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. हे अ‍ॅप पूर्णपणे विनामूल्य आहे.

हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची प्रोसेस काय आहे?

– आपणास मोबाईलवर हे अ‍ॅप वापरायचे असेल तर प्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा आयफोनच्या अ‍ॅप स्टोअरवर जा. तेथे JioMeet अ‍ॅप शोधा आणि डाऊनलोड करा.

– जर आपल्याला हे अ‍ॅप डेस्कटॉपवर वापरायचे असेल तर आपण या लिंकवर क्लिक करू शकता- https://jiomeetpro.jio.com/home#download या लिंकवर आपल्याला अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल.

जिओ प्लॅटफॉर्मने 30 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप अशा वेळी सुरू करण्यात आले आहे जेव्हा बहुतेक लोक कोरोना विषाणूमुळे घरून काम करत असतात. या अ‍ॅपसह जिओ प्लॅटफॉर्मची टक्कर झूम, गुगल मीट, वेबएक्स सारख्या अ‍ॅप्सशी असेल.