फायद्याची गोष्ट ! फक्त 69 रूपयांत फ्री कॉल अन् 7GB डेटा, भन्नाट प्लॅनबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रिलायन्स जिओ आपल्या युजर्संसाठी लागोपाठ अनेक नवीन प्लान घेऊन येत आहे. नवीन प्लान्समध्ये युजर्संना जास्तीत जास्त डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा दिला जात आहे. जिओ फोन युजर्संसाठी सुद्धा कंपनी अनेक जबरदस्त प्लान घेऊ आली आहे. कंपनी युजर्ससाठी दोन जबरदस्त आणि स्वस्तातील प्लॅन घेऊन आली आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा सुद्धा मिळतो. जाणून घ्या जिओच्या दोन नविन प्लॅन विषयी.

69 रुपयांचा प्लान, फ्री कॉलिंग आणि 7GB डेटा

जिओचा 69 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना 7GB डेटा मिळतो. या प्लानची वैधता 14 दिवसांची असून यामध्ये युजर्संना अनलिमीटेड कॉलिंग एकदम फ्री दिले आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 250 नॉन जिओ मिनिट देण्यात आली आहेत. या प्लानमध्ये 25 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच युजर्संना जिओ अॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

49 रुपयांच्या प्लान, फ्री कॉलिंगसोबत 2GB डेटा

जिओफोनचा आणखी एक स्वस्त प्लान आहे. 49 रुपयांत या प्लानची वैधता 14 दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना एकूण 2GB डेटा मिळतो. याशिवाय जिओ कॉलिंग एकदम फ्री आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये 250 नॉन जिओ मिनिट मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना 25 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.

75 रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये 3GB डेटा

जिओफोन युजर्संसाठी 75 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना 3GB डेटा मिळतो. जिओ ते जिओ फ्री कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 500 नॉन जिओ मिनिट मिळतात. प्लानमध्ये युजर्संना 50 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.