खुशखबर ! Jio ची धमाकेदार दिवाळी ‘ऑफर’, 699 रूपयांमध्ये जिओ मोबाईल, 800 ची बचत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने देशात साजरे करण्यात येणाऱ्या सणांचा विचार करुन मंगळवारी आपल्या 4 जी जिओ फोनच्या किंमतीत 50 टक्क्यांनी कपात केली. आता हे फोन फक्त 699 रुपयांना उपलब्ध होतील.

कंपनीने दावा केली की जिओ फोन सादर करण्यात आल्यानंतर जवळपास 7 कोटी 2 जी वापरकर्त्यांना जोडण्यात येईल. अशा प्रकारच्या 35 कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष कंपनीने ठेवले आहे.

जिओकडून सांगण्यात आले की, दसरा आणि दिवाळीच्या उत्साहा दरम्यान जिओ फोन 699 रुपये या विशेष किंमतीला उपलब्ध करुन देण्यात येईल. तर सध्या याची किंमत 1500 रुपये आहे. यामुळे ग्राहकांचा थेट 800 रुपयांचा फायदा होणार आहे. तसेच यासाठी कोणतीही अट नाही किंवा ना की तुम्हाला 699 रुपये किंमतीचा मोबाइल दुसऱ्या मोबाइल एक्सचेंजवर मिळणार आहे. शिवाय जिओकडून ग्राहकांना पहिल्या 7 रिचार्जवर 99 रुपयांचा अतिरिक्त इंटरनेट डाटा देण्यात येईल.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि प्रबंध निदेशक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ यासाठी प्रयत्न करेल की भारतीय स्वस्तातील डाटा आणि डिजिटल क्रांतिपासून वंचित राहणार नाही. सर्वात खालच्या स्तरातील व्यक्तीला देखील इंटनेट अर्थव्यवस्थेला जोडण्यासाठी आम्ही प्रत्येक नव्या व्यक्तीला जिओ दिवाळी भेट देऊन 1500 रुपयांची गुंतवणूक करत आहोत. या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडिया मिशनच्या यशासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

Visit : policenama.com