ग्राहकांमध्ये खळबळ उडल्यानंतर Jio नं केली मोठी घोषणा, ‘या’ कस्टमरला मिळत राहणार फ्री कॉलिंग

पोलीसनामा ऑनलाईन : रिलायन्स जिओने नॉन-जिओ कॉलिंगवरुन आपल्या ग्राहकांकडून पैसे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आतापर्यंत लोकांना हा संभ्रम होता की हे कधीपासून लागू होईल. अशातच रिलायन्स जिओचे एक विधान पुढे आले असून त्यानंतर लोकांना आता या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

रिलायन्स जिओने म्हटले आहे की ज्या ग्राहकांनी ९ ऑक्टोबरपूर्वी आपला नंबर रिचार्ज केला होता ते विना-जिओ वापरकर्त्यांनाही विनामूल्य कॉल करू शकतील. मात्र हा प्लॅन संपल्यानंतर आपल्याला इतर कंपन्यांना कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागतील.

रिलायन्स जिओने एक ट्विट केले. यात कंपनीने म्हटले आहे की, “जर आपण ९ ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी रिचार्ज केले असेल तर आपण आपली योजना संपेपर्यंत विनामूल्य कॉल करू शकाल.”

रिलायन्स जिओच्या सर्वाधिक लोकप्रिय योजनेची वैधता ८४ दिवसांची आहे. परंतु काही पॅकची एक वर्षाची वैधता आहे. जर आपण ९ ऑक्टोबरला किंवा त्यापूर्वीच्या ३९९ रुपयांच्या योजनेसह आपला Jio नंबर रिचार्ज केला असेल तर ८४ दिवसांसाठी आपण विना-जिओ नंबरवर विनामूल्य कॉल करू शकाल. तथापि, १ वर्षाच्या वैधतेच्या योजनेच्या वापरकर्त्यांचे काय होईल याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.

महत्त्वाचे म्हणजे जेव्हा २०१७ मध्ये ट्रायने आययूसी म्हणजेच इंटरकनेक्ट वापर शुल्क (Interconnect Usage Charge) १४ पैशांवरुन ६ पैशांवर आणले तेव्हा असे म्हटले गेले की या वर्षाच्या अखेरीस ते शून्यापर्यंत कमी केले जाऊ शकते.

जर आपल्या Jio योजनेची वैधता तीन महिन्यांपर्यंत असेल आणि आपण ९ ऑक्टोबरपूर्वी रिचार्ज केला असेल तर आपण अद्याप नॉन-जिओ कॉलिंग विनामूल्य करू शकता, परंतु जर ट्रायने आययूसी झिरो केल्यास Jio वरून कॉल नॉन-जिओ कॉलिंग देखील विनामूल्य असेल. दरम्यान, रिलायन्स जिओनेही आपल्या वेबसाइटवर ही योजना अद्ययावत केली आहे. आता रिलायन्स जिओ योजनेसह No IUC Voice प्लॅन जोडला गेला आहे.

visit : policenama.com