Jio कडून 49 आणि 69 रूपयाचे प्लॅन लॉन्च, अनलिमिटेड कॉलिंगसह ‘हायस्पीड’ डेटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने दोन नवीन योजना सादर केल्या आहेत. या दोन्ही योजना प्रीपेड वापरकर्त्यांसाठी असून अल्प मुदतीच्या असल्याचे समजते. दोन्ही प्रीपेड योजनेंतर्गत 14 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याशिवाय व्हॉईस कॉलिंग, डेटा व एसएमएसदेखील उपलब्ध आहेत.

69 रुपयांच्या योजने अंतर्गत दररोज 0.5GB जीबी हायस्पीड डेटा उपलब्ध असेल. डेटाची मर्यादा संपल्यानंतर, आपल्याला 64 केबीपीएस गती मिळेल. या योजनेत जिओ टू जिओ अमर्यादित कॉलिंग करता येईल. तर नॉन जिओ कॉलींगसाठी 250 मिनिटे दिली आहेत. याशिवाय यात 25 एसएमएस असून जिओ अ‍ॅप्समध्ये अ‍ॅक्सेस देण्यात येणार आहे. या योजनेची वैधता 14 दिवसांची आहे.

तसेच 49 रुपयांच्या योजनेत तुम्हाला 2 जीबी डेटा मिळेल. या व्यतिरिक्त या योजनेत आपणास जिओ टू जिओ अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल. याशिवाय 250 मिनिटे नॉन- जिओ कॉलिंगसाठी देण्यात येतील. 49 रुपयांच्या या प्रीपेड योजनेत 14 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासह, 25 एसएमएस देखील देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 49 आणि 69 रुपयांशिवाय 153 रुपयांची जिओ प्लॅनदेखील आहे. याअंतर्गत वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येतो. त्याची वैधता 28 दिवस आहे. दररोज जिओ व 100 एसएमएसकडून अमर्यादित कॉलिंग दिले जाते.