5 पटीनं महाग होणार डाटा ? Jio नं केली TRAI कडं ‘शिफारस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील टेलिकॉम कंपन्या सध्या अतिशय बिकट स्थितीतून वाटचाल करत आहेत. याचा परिणाम हळू-हळू ग्राहकांवर दिसू लागला आहे. नुकतेच टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ वाढविले आहे. परंतु, आता मोबाईल वापरणे तुमच्यासाठी आणखी महाग ठरू शकते.

टेलिकॉम रेग्यूलेटरी बॉडी म्हणजेच ट्राय ‘वन फ्लोअर प्रायसिंग’ आणण्याची तयारी करत आहे. रिलायन्स जिओने ट्रायला फ्लोअर प्राईज वाढविण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने म्हटले आहे की, सुरूवातीला डेटासाठी 15 रूपये प्रति जीबी फिक्स केले पाहिजेत.

रिलायन्स जिओने ट्रायला हादेखील सल्ला दिला की, सहा ते नऊ महिन्यानंतर हा दर वाढवून 20 रूपये प्रति जीबी सुद्धा करता येईल. ईटी टेलिकॉमच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या संदर्भाने ही माहिती देण्यात आली आहे.

रिपोटनुसार रिलायन्स जिओने म्हटले आहे की, भारतीय कस्टमर्स प्राईज सेस्निटीव्ह आहेत. फ्लोअर प्लॅन एकदाच वाढवून चालणार नाही. काही अंतराने फ्लोअर प्लॅनमध्ये वाढ करावी.

टेलिकॉम कंपन्या सरकारला हजारो करोड रूपये देणे लागतात. यामुळे वोडाफोन आयडियासारख्या कंपन्या सर्व्हायव्हलसाठी धडपडत आहेत. ट्राय एक कन्स्लटेशन पेपरवर काम करत आहे. जेणेकरून हे रिव्हाईव्ह करता येईल. फ्लोअर प्रायसिंग अंतर्गत डेटासाठी एक बेस प्राईज फिक्स करण्यात येईल.

नुकतेच वोडफोन आयडियाने डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमला पत्र लिहिले आहे. कंपनीने म्हटले आहे की, 1 जीबी डेटाची मिनिमम प्राईज 35 रुपये केली पाहिजे. सध्याच्या काळात तुम्ही 1 जीबी डेटासाठी सुमारे 4 ते 5 रूपये देता.

आता वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ दोन्ही कंपन्या या फ्लोअर प्रायसिंग अंगतर्गत डेटाच्या किमतीत वाढ करण्याचा प्रयत्न शिफारसीद्वारे करत आहेत. म्हणजेच येत्या काळात काहीतरी निर्णय होऊ शकतो.

जर ट्रायने या दोन्ही कंपन्यांच्या शिफारशींवर मध्यम मार्ग काढला तरी डेटाच्या किमती वाढतील. डेटा प्राईज वाढविण्याचा अर्थ त्याचा थेट परिणाम तुमच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनवर होईल आणि तो अगोदरपेक्षा महाग होईल.

सध्या हे स्पष्ट नाही की केव्हापासून ही दरवाढ होईल. परंतु, टेलिकॉम इंडस्ट्रीची सध्याची आर्थिक स्थिती पाहता वाटते की, मोबाइल डेटा यूज करणे आता लवकरच महागडे ठरू शकते. कारण कंपनीने ही दरवाढ केली तर हळूहळू सर्व कंपन्या दरवाढ करतील. भारतात सध्या खुपच कमी टेलिकॉम प्लेयर शिल्लक आहेत. यासाठी तुमच्याकडे पर्याय सुद्धा खुप कमी असतील.