‘ही’ Jio ची फ्री सर्व्हिस एकदम भन्‍नाटच, विना सीम देखील करता येणार वापर, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – जिओ या दूरसंचार कंपनीच्या सेवेद्वारे अनेक सुविधा आपल्याला मोफत मिळत आहे. कमीतकमी शुल्कामध्ये आपल्याला अनलिमिटेड कॉल, इंटरनेट सारख्या सुविधा मिळत आहेत. मात्र आता तुमचा राहिलेला डेटा तुम्हाला ट्रान्स्फर करता येणार आहे. जिओच्या एका विशेष ऍपद्वारे हा डेटा ट्रान्स्फर करता येणार असून जिओचे सिम वापरणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. मात्र तुम्ही देखील हे अ‍ॅप वापरू शकता.

जाणून घेउयात यासाठी काय करावे लागेल
1) तुम्हाला सुरुवातीला Play Store वरून Jio Switch हे ऍप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये Send आणि Receive असे दोन पर्याय दिसतील.

2) तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोटो, व्हिडीओ किंवा गाणे पाठवायचे असल्यास Send वर क्लिक करा. त्यानंतर तेथे तुमच्यासमोर Videos, Photos, Applications, Music, Files, Contacts, Calender यांसारखे काही पर्याय येतील.

3) त्यानंतर तुम्हाला जे काम करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे हवे आहे ते निवडल्यानंतर तुम्ही Send या बटनावर क्लिक करा.

4) त्याचबरोबर ज्या फोनमध्ये आपल्याला फोटो पाठवायचा आहे त्या फोनमधील Receive पर्याय ऑन हवा. त्यामुळे तुम्ही देखील हे ऍप वापरून तुमचा डेटा ट्रान्स्फर करण्यास उपयोग करू शकता.

 

Visit : Policenama.com