Airtel vs Jio vs Vi : फ्री डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंगचे भन्नाट प्लान, 84 दिवसांची वैधता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचे जर मोबाईल सिम या तीन कंपन्यांपैकी कोणतेही असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. फ्री डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंगचे बेस्ट प्लान भारताच्या टेलिकॉम मार्केटमध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे. या कंपन्यांनी खूप सारे प्रीपेड प्लान कंपनी ऑफर केले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये सर्व कंपन्यांचे प्लान महाग झाल्यानंतर ८४ दिवसांची वैधता असलेला प्लानसाठी युजर्सला सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहे. जर तुम्हाला कमी किमतीत मोठी वैधताचे प्लान हवे असेल तर जिओ आणि वोडाफोन आयडियाचे तीन प्लान ऑफर केले जात आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डाटा मिळू शकतो.

जाणून घेऊयात या प्लानविषयी ….

रिलायन्स जिओचा ३२९ रुपयांचा प्लान
जिओ युजर्ससाठी ३२९ रुपयांचा प्लान आहे. यात एकूण सहा जीबी डेटा आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. या जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग शिवाय बाकीच्या नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी तीन हजार एफयूपी मिनिट मिळते. १ हजार फ्री एसएमएसशिवाय जिओ अॅप्स कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन ऑफर करते.

एअरटेलचा ३७९ रुपयांचा प्लान
एअरटेल प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये योजनेतला सहा जीबी डाटा मिळतो. पूर्ण वैधतेसोबत ९०० एसएमएस ऑफर केले जाते. प्लान सोबत एअरटेल एक्सटीम ॲपचे प्रीमियम सबस्क्रीप्शन्स मिळते. प्लान Shaw Academy फ्री कोर्से शिवाय दीडशे रुपयांचे फास्टटॅग बेनिफिट्स ऑफर करतो.

Vi चा ३७९ चा प्लान
वोडाफोन आयडियाकडून ऑफर केला जात असलेला ३७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६ जीबी ४जी डेटा शिवाय अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग दिली जाते. चौऱ्याऐंशी दिवसांचे वैधता मिळते. १००० एसएमएस मिळते. व Vi Movies अँड Tv ॲप्लीकेशन चे ॲक्सेस मिळते.