Jio vs Airtel vs Voda : कोणाचा 399 रुपयांचा ‘प्लॅन’ खास, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन कडून ग्राहकांना अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर केले जातात. विशेष बाब म्हणजे या तिन्ही कंपन्या ग्राहकांना 399 रुपयांचा प्लॅन ऑफर करतात आणि तिन्हीच्या योजनांची वैधता 56 दिवसांची आहे. या कंपन्यांच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय फरक आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

जिओचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन –
या प्लॅननुसार ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो, नंतर वेग कमी होऊन 64 केबीपीएस होतो. याशिवाय ऑन-नेट फ्री कॉलिंग आणि ऑफ – नेट कॉलिंगसाठी 2,000 FUP मिनिटे दिली जातात. यात ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. या सर्वांव्यतिरिक्त JioTV आणि JioSaavn सारख्या जिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही या प्लॅनमध्ये ग्राहकांना देण्यात आले आहे.

एअरटेलचा 399 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा व्यतिरिक्त अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातात. हा प्लॅनदेखील 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. या सर्व फायद्यांबरोबरच या प्लॅनमध्ये कॉम्प्लिमेंट्री जी 5 सबस्क्रिप्शन, एअरटेल एक्सट्रीम सबस्क्रिप्शन, फ्री हॅलो ट्यून्स, विंक म्युझिकचे अ‍ॅक्सेस, शॉ अ‍ॅकॅडमीचे फ्री अ‍ॅक्सेस आणि एअरटेलकडून फास्टॅग (FASTag) खरेदीवर 150 रुपयांचा कॅशबॅकदेखील देण्यात आला आहे.

व्होडाफोनचा 399 रुपयांचा प्लॅन –
व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा, अमर्यादित लोकल / एसटीडी कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातात. या व्यतिरिक्त, कंपनी 28 दिवसांच्या वैधतेसाठी अतिरिक्त 5 जीबी डेटा देखील देते. या प्लॅनची एकूण वैधता 56 दिवस आहे. व्होडाफोनचा हा प्लॅन घेत असलेल्या ग्राहकांना व्होडाफोन प्ले अ‍ॅप आणि जी 5 चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते.