फायद्याची गोष्ट ! Jio आणि Vodafone च्या 98 रूपयांच्या प्लॅनमध्ये मिळतात ‘हे’ फायदेच फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही महिन्यांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढविल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर होता. यादरम्यान वोडाफोन, आयडिया आणि एअरटेल कंपनीला टक्कर देण्यासाठी जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त नवीन ऑफर आणली आहे. कंपनीकडून आता प्रीपेड ग्राहकांना 98 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत बंपर ऑफर देण्यात येणार आहेत. ग्राहकांना अवघ्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जीओचा 98 रुपयांचा प्रीपेड प्लॅन :
jio कंपनीकडून 98 रुपयांचा हा प्लॅन ग्राहकांसाठी खास देण्यात आला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असणार आहे. यामध्ये ग्राहकांना 2 GB डेटा तसेच 300 SMS आणि जिओ ते जिओ अनलिमिडेट फ्री कॉलिंग सुविधा मिळणार आहे. तसेच इतर नेटवर्कसाठी 124 मिनिटं मिळणार आहेत. यासोबत ग्राहकांना जिओ अ‍ॅपचा मोफत लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, जिओ आणि वोडाफोन या दोन्ही कंपन्यांनी आपला शंभर रुपयांपेक्षा कमी प्लॅन लाँच केला आहे. यापैकी कोणता प्लॅन निवडायचा असा प्रश्न पडतो. त्यामुळे जर तुम्ही नेटचा जास्त वापर करत असाल तर तुम्हला जिओ परवडण्याजोगा आहे तर कॉलिंगसाठी वोडाफोन उत्तम पर्याय आहे.

वोडाफोनचा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन :
99 रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन ग्राहकांसाठी खास वोडाफोन – आयडिया कंपनीकडून देण्यात आला आहे. 18 दिवसांची व्हॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 GB डेटा, रोज 100 SMS आणि अनलिमिडेट कॉलिंग फ्री मिळणार आहे. वोडाफोन प्लेसाठी कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन सोबत 999 रुपयांमध्ये ZEE 5 अ‍ॅपसाठी सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like