‘Jio’ देणार ‘हॉलोबोर्ड MR’ची सुविधा, ग्राहकांना ‘शॉपिंग’चा तर विद्यार्थ्यांना ‘अभ्यासा’चा मिळणार ‘खास’ अनुभव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने ग्राहकांना एक नवीन गिफ्ट दिले आहे. आता तुम्ही घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने व्हिडिओ कॉल करु शकतात. यासाठी सेट टॉप बॉक्सला गिगा फायबर नेटवर्कने जोडावे लागेल. कंपनी उपलब्ध करुन देत असलेली ही सुविधा म्हणजे डिजिटल युगातील एक क्रांती समजली जात आहे.

आता कंपनीने हॉलोबोर्ड MR हेडसेट सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे. यामाध्यमातून कंपनी ग्राहकांना शॉपिंगचा, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा खास अनुभव मिळेल अशी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. यामाध्यमातून चित्रपटाचा पाहण्याचा उत्तम अनुभव मिळेल.

काय आहे जिओ हॉलोबोर्ड MR हेडसेट
शॉपिंगसाठी रिलासन्सने एक विशेष ऑग्मेंटेज रिअ‍ॅलिटी डिवाइस MR हेडसेट सादर केला आहे. यामाध्यामतून तुम्ही गारमेंट ३६० डिग्रीमध्ये पाहून शकतात. यामुळे तुमची शॉपिंग सहज होऊन जाईल. या डिवायसच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाचा नवा अनुभव घेऊ शकतात. यामाध्यमातून तुम्ही अंतराळ, चंद्रयानच्या माध्यमातून अभ्यास करु शकतात. यातून तुम्ही सिनेमा पाहण्याचा देखील चांगला अनुभव घेऊ शकतात. यातून तुम्हाला चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्या सारखा अनुभव मिळेल.

५ सप्टेंबरपासून सुरु होणार जिओ फायबर सर्विस
जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. याचे प्लॅन १०० Mbps पासून सुरु होतील. हा स्पीड बेसिक प्लॅनसाठी असेल. प्लॅननुसार हा स्पीड १ Gbps जाईल. यात सर्व वाइस कॉल फ्री असणार आहे. जिओ फायबरचे प्लॅन ७०० रुपयांपासून सुरु होईल.

आरोग्यविषयक वृत्त