खुशखबर ! ‘Jio’ ग्राहकांना देणार ‘हायस्पीड’ 5G ‘नेटवर्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय इंटरनेट क्षेत्रात जिओ ५ जी नेटवर्कची सुविधा आपल्या ग्राहकांना देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना जिओच्या ५ जी नेटवर्कमुळे स्पर्धा निर्माण होणार आहे. धमाकेदार ऑफर आणि प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करुन दिले आहेत. भारतीय बाजारात सध्या इंटरनेट उपलब्ध करुन देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यात ब्रॉडबॅन्ड क्षेत्रात नॅशनल आणि लोकल अशा अनेक कंपन्यांचा समावेश होतो.

जिओ ५ जी नेटवर्क रेडी –

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ ५ जी नेटवर्क रेडी आहे. तर वायरलेस नेटवर्क ४ जी ला ५ जी मध्ये बदलण्यात येईल. त्यांच्या मते जिओ होम ब्रॉडबॅड सेवा, इंटरप्राइस सेवा, ब्रॉ़डबॅड फार एसएमई हे या वर्षात सुरु करणार आहेत. येणाऱ्या काळात घराघरात कनेक्टेड डिवाइस असतील. याशिवाय २ अरब आयओटी डिवाइस असतील. जिओ गीगाफायबरसाठी १.५ कोटी नोंदणी १६०० शहरात झाली आहे. कंपनी आता ब्रॉडबँडची सेवा वाढवणार आहे. ५ लाख घरात फायबर ब्रॉडबँडची सेवा देणात येत आहे. तेथे १०० जीबी महिन्याला उपयोग होत आहे. १ वर्षात गीगाफायबर सर्व देशात पसरेल.

स्टार्टअपसाठी घोषणा –

जिओ संपूर्ण देशात वर्ल्ड क्लास डेटा सेंटर स्थापित करणार आहे. स्टार्टअपसाठी जिओने मोठी घोषणा केली आहे. आता जिओ कनेक्टिविटी आणि क्लाऊड सेवा मोफत देणार आहे. ही सेवा स्टार्टअपला १ जानेवारी २०२० पासून मिळेल. जिओ त्या सर्व स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करेल. जे देशात डिजिटल क्रांती, मायक्रो अॅण्ड स्मॉल बिजनेस, कृषि उद्योग, ऑटोमेशन क्षेत्रात काम करतील. ज्याच्या काही खास कल्पना असतील आणि जे स्टार्टअप देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. मायक्रोसॉफ्टने रिलायन्सबरोबर क्लाऊड इंफ्राचा करार केला आहे. यामुळे जिओ आता ही सुविधा उपलब्ध करुन देत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –