Jio चा नवा प्लान ! 150mbps स्पीड सोबत अनलिमिटेड डेटा, तर 30 दिवसांची ‘फ्री ट्रायल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील सर्वात मोठी कंपनी असणारे टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने आता बाजारात प्रीपेड पासून ब्रॉडबँड पर्यंत अनेक योजना (Plans) आणले आहे. तर कंपनीची जिओ फायबर एक असा प्लान आहे. याची सेवा वापरकर्त्यांना अधिक पसंत पडत आहे. यासाठी कंपनीने जिओ फायबर काही नवीन प्लान्स तयार केले होते. याची किंमत ३९९ रुपये पासून ते १४९९ रुपयापर्यंत होती. यासह कंपनीने १ महिन्याचा विनामूल्य टायल प्लान आणला आहे. यामध्ये 150Mbps ची स्पीड समाविष्ट केली आहे.

तसेच, सोबत 4k सेट टॉप बॉक्स सुद्धा दिला जात आहे. ज्यामध्ये कोणत्याही अधिक चार्ज विना 10 OTT चे अ‍ॅक्सेस दिले जात होते. तर सर्व टेस्ट केल्यानंतर या योजनेला (plans) ट्रायलसाठी साइन अप केले जाऊ शकत नाही. दरम्यान, आतापर्यंत JIo Fiber फक्त २ प्लान्सचे पर्याय उपलब्ध करीत होते. ज्याला युजर्संकडून ट्रायल बुक केले जाऊ शकत होते. तर या पॅकमध्ये वापर करीत असलेले वापरकर्ते समजू शकतात की, हा प्लान कसा आहे. जर तुम्हाला JioFiber ब्रॉडबँड सर्विस घेण्याचा विचार करीत असाल तर हे सर्व प्लान ट्राय करू शकता. जाणून घ्या.

JIo Fiber चे ३० दिवसाचा ट्रायल प्लान –

१५०० रुपयांचा ट्रायल पॅक :

हा पॅक दिवसांच्या वैधतेसोबत (Validity) येतो. याची कोणतीही भाडे खर्च (Rental cost) नाही. या प्लानध्ये 150Mbps Data विना कोणत्याही FUP लिमिट अंतर्गत दिला जातो. सोबत ३.३ TB data १ महिनासाठी दिला जातो. सोबत कोणत्याही लिमिटचे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात युजर्संवा कोणतीही OTT फायदा दिला जात नाही. यासोबत वापरकर्त्यांना फ्री मॉडम किंवा राउटर दिला जाणार आहे. हा एक रिफंडेबल प्लान आहे.

२५०० रुपयांचा ट्रायल पॅक :

हा पॅक ३० दिवसांची वैधता सोबत येतो. याची कोणताहीभाडे खर्च (Rental cost) नाही. या प्लानमध्ये 150Mbps Data विना कोणत्याही FUP लिमिट शिवाय दिला जात आहे. सोबत ३.३ TB data १ महिन्यासाठी दिला जातो. सोबत कोणत्याही लिमिटविना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात वापरकर्त्यांना Disney+ Hotstar VIP, JioCinema, ZEE5 Premium, Sony Liv, Voot, ALTBalaji, Sun NXT, Shemaroo, Lionsgate Play आणि Hoichoi OTT प्लॅटफॉर्म्सचे अ‍ॅक्सेस दिले जाते. यासाठी वापरकर्त्यांना विनामूल्य मॉडम किंवा राउटर दिले जाते. हा एक रिफंडेबल प्लान आहे.