लवकरच येत आहे ‘Jio Phone 3’ : प्रत्येक खिशाला परवडणाऱ्या फोनची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओचा कंपनी आता लवकरच आपला नवीन जिओ फोन आणण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओने २०१७ मध्ये जिओफोन सीरिजची सुरुवात केली होती. हे 4 जी फोन असून बजेटमध्ये असल्याने ग्राहकांचा या फोनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला. जिओफोन लाँच केल्यानंतर गेल्यावर्षी कंपनीनं फीचर्स फोन जिओफोन २ आणला होता. आता कंपनीने इंडियाचा स्मार्टफोन सीरिजच्या जिओ फोन ३ वर काम सुरू केल्याचे समजत आहे. या फोनसंदर्भातील माहिती लीक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओने आता अत्याधुनिक असा जिओ फोन ३ आणण्याची तयारी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात या फोनची किंमत साधारणपणे ४ हजार ५०० रुपये इतकी असणार असल्याचे समजत आहे. हा फोन जुलैपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. शिवाय जिओच्या आधीच्या फोनपेक्षा या फोनची किंमत जास्त आहे.

दरम्यान, रिलायन्स जिओने बाजारात आणलेल्या फीचर फोनची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून आली. मुख्य म्हणजे भारतातील टॉप फोन्स ब्रान्डसच्या यादीत या फोनने स्थान पटकावले आहे. तसेच फीचर फोन्सच्या सेल चार्टमध्ये अव्वल स्थानी आहे. अशातच आता रिलायन्स जिओ फोन ३ आणणार आहे.

Jio Phone 3 ची वैशिष्ट्ये
५ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले
२ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज
५ मेगापिक्सल रिअर आणि २ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

Loading...
You might also like