Jio च्या नव्या ऑफेरने सर्वत्र ‘खळबळ’ ! आता ‘फक्त’ 99 रुपयात 1 वर्ष सर्वकाही ‘एकदम’ फ्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील टेलिकॉम जगतात सध्या फार गोंधळाचे वातावरण आहे. जिओने बाजारात पाऊल ठेवल्यानंतर आणेल कंपन्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जिओने उपलब्ध करून दिलेल्या स्वस्त सेवांमुळे या कंपन्यांना देखील त्याच किमतीत सेवा उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. सध्या जीओची एक नवीन 99 रुपयांची ऑफर धुमाकूळ घालत असून यामध्ये 365 दिवस सर्व काही मोफत मिळणार आहे.

ऑनलाईन पेमेंट ऍप पेटीएम बरोबर मिळून जिओने ऑफर बाजारात आणली असून यामध्ये 1,500 रुपये कॅशबॅक आणि 100 रुपयांचे तात्काळ कॅशबॅक दिले जात आहे. त्यामुळे जर तुम्ही पेटीएमवरून पहिल्यांदा रिचार्ज करत असाल तर तुम्हाला 1,699 वाल्या प्लॅनवर 1,500 रुपये कॅशबॅक आणि 100 रुपये तात्काळ कॅशबॅक मिळणार असल्याने हा प्लॅन तुम्हाला केवळ 99 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत फोन रिचार्ज केला नसेल तर तुमच्यासाठी हि फार उत्तम संधी आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like