Jio नं लॉन्च केला ‘JioTVCamera’, टीव्हीवरुन करता येणार ‘व्हिडीओ-कॉलिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने जिओ टीव्ही कॅमेरा (JioTVCamera) भारतात लॉन्च केला आहे. जिओ फायबरच्या लॉन्चिंग दरम्यान जिओने सांगितले की, जिओ फायबर्सचे यूजर्स जिओ फायबर सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करु शकतात.

टीव्हीद्वारे करा व्हिडीओ कॉलिंग –
जिओ टीव्ही कॅमेरा एक छोटा सी – डिवाइस आहे ज्याला टीव्हीने कनेक्ट केला जाईल. यानंतर टीव्हीवरुनच व्हिडीओ कॉलिंग केले जाईल. जिओ टीव्ही कॅमेऱ्याला जिओच्या वेबसाइटद्वारे खरेदी केले जाऊ शकते. याची किंमत 2,999 रुपये आहे.

मिळेल 1 वर्षांची वॉरंटी –
यासह कंपनी ईएमआय देखील देत आहे आणि तीन दिवसात डिलीवरीची खात्री देत आहे. यासह 1 वर्षांची वॉरंटी मिळेल आणि कोणतीही समस्या असल्यास सात दिवसात रिप्लेस देखील मिळेल.

वजन फक्त 93 ग्रॅम –
JioTVCamera ला टीव्हीमध्ये एक केबलच्या माध्यमातून कनेक्ट केले जाईल. त्यानंतर हे टीव्हीच्या वर ठेवावे लागेल. सध्या हा कॅमेरा फक्त जिओ फायबर ग्राहकांसाठी आहे. जिओ टीव्ही कॅमेऱ्यामध्ये 120 डिग्री वाइल्ड अँगल आहे. याशिवाय याचे वजन फक्त 93 ग्रॅम आहे.