Jitan Ram Manjhi | ‘नवनीत राणांसह 5 खासदार बनावट जात प्रमाणपत्रावर लोकसभेत निवडून गेले’; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा


नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
Jitan Ram Manjhi | बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा (MP Navneet Rana) यांच्यासह एकूण 5 खासदार हे बनावट जात प्रमाणपत्राच्या (forged sc certificates) आधारावर लोकसभेत निवडून गेल्याचा खळबळजनक दावा मांझी यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

एका केंद्रीय मंत्र्यासह 5 खासदारांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडून गेले असल्याचं जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी म्हटलं आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री एसपी बघेल (Union Minister SP Baghel) आणि जे शिवाचार्य महास्वामीजी (J. Shivacharya Mahaswami) या 2 भाजप खासदारांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे खासदार मोहम्मद सादिक (MP Mohammad Sadiq), महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत रवी राणा (MP Navneet Ravi Rana) आणि तृणमूल काँग्रेसच्या अपरुपा पोद्दार (Aparupa Poddar) यांच्या नावांचा समावेश केला आहे.

दरम्यान, खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलासा दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
तसंच, तक्रारदारांना नोटीसही बजावण्यात आली आहे.
नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ
(Anandrao Adsul) यांनी केला होता.
त्यामुळे उच्च न्यायालयाने (High Court) हे प्रमाणपत्र रद्द केले होते.
त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
यानंतर कोर्टाकडून नवनीत राणा यांना दिलासा मिळाला.

नोकरी आणि स्थानिक निवडणुकांमध्ये दलितांसाठी निश्चित करण्यात आलेल्या कोट्यातील 15 ते 20 टक्के जागा इतरांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मिळवल्या आहेत.
मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी आपल्या पक्षाच्या सर्व संघटनात्मक संघटना बरखास्त करण्याची घोषणा केली असून लवकरच पुनर्रचना केली जाणार असल्याचं जीतन राम मांझी यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

 

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Jitan Ram Manjhi | 5 mp elected on forged sc certificates including maharashtra mp navneet rana said jitan ram manjhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update