Jitendra Awhad | अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी जितेंद्र आव्हाड सुप्रीम कोर्टात; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर…?”

दिल्ली : वृत्तसंस्था- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अनंत करमुसे (Anant Karmuse) नावाच्या व्यक्तीला मारहाण केली होती. 25 नोव्हेंबरला त्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनवाई झाली. या सुनवाई दरम्यान सुप्रीम कोर्टाने जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली.

 

सुनावणी बद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, ‘हा गुन्हा पावणे तीन वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हाच चार्जशीट कोर्टात दाखल झाली. तत्कालीन सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्रावर लिहून दिलंय. याचा निकालही जाहीर झाला आहे. पण, जो तपास झाला तो चुकीचा होता, त्यात त्रुटी राहिल्यात. असं काहीतरी सुप्रीम कोर्टात सांगावं लागेल. सरकार बदलतात पण पोलीस बदलत नाही. पोलिसांनी आधी खोटं काम केलं, असं जर सर्वोच्च न्यायालयात म्हटलं गेलं तर मला अडकवण्यासाठी हे सर्व चाललं हे स्पष्ट होईल.’

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर महाराष्ट्रात काय रिएक्शन येईल.
मी तसा मुख्यमंत्र्यांहून छोटा कार्यकर्ता आहे. पण, मलाही मानणारे ४ लोक आहेत.
तुमचा असा फोटो टाकला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. शेवटी मी माणूस आहे.
त्यामुळे एखादी बाजू मांडताना दुसरी बाजूही विचारात घ्यायची असते.’
त्याचसोबत राज्य सरकार आपल्याविरोधात असेल तर आपल्याला लढायचं आहे.
त्यामुळे जेव्हा मानसिकदृष्ट्या तयारी असते तेव्हा, जेलचे दरवाजे आणि लोखंडी सळ्या काय वाटत नाही.
मी खून, बलात्कार केला नाही, असेही आव्हाड म्हटले.

 

Web Title :- Jitendra Awad in Supreme Court in Anant Karamuse beating case; Said, “If you post a half-naked photo of the Chief Minister…?”

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लोणी काळभोर व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जण ताब्यात

Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी काढली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा

Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दिलासा ! उच्च न्यायालयाची जामिनाविरोधात सुनवाई करण्यास नकार