निवडणूक आयोग हा देशावर लागलेला ‘कलंक’ : जिंतेद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग हा देशावर लागलेला कलंक आहे. अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्या नतंर त्यांना मतदार यादीत त्यांच्या वडिलांचे नाव असल्याचे आढळाळुन आले. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. इलेक्शन कमिशन हे देशावर कलंक आहे.

आयोगाकडून अतिशय वाईट काम सुरू आहे. माझे वडील २ वर्षांपूर्वी वारले. त्यांचे नाव अजून मतदारयादीत आहे. दुसरीकडे जिवंत आहेत त्यांची नावे अजून सापडत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करून व्यवस्था सुधारायला हवी, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, बविआने ६० हजार मतदारांची नावे दुबारा आल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेने ५६ हजार मतदारांची दोनदा नावे असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर, एकाच महिलेचे ६८ वेळा मतदारयादीत नाव असल्याचेही समोर आले आहे.