ट्विटरवर सुपरअ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या ‘या’ नेत्याला शरद पवारांनी दिले मोठे पद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसात सोशल नेट्वर्किंग साईटस वरून आपली मते मांडणारे तसेच विरोधकांवर सडेतोड टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आता राष्ट्रवादीकडून महत्वाचे पद मिळाले आहे. राज्यांत सध्या सर्वत्र इलेक्शन फिव्हर असताना सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीकडून सरचटणीस पद मिळले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीने त्यांना पक्षातील महत्वाचे पद दिले आहे. जितेंद्र आव्हाड हे पवारांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून ओळखले जातात. याशिवाय सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड हे अधिक आक्रमक आणि परखडपणे मांडत असतात. सोशल मीडियावर त्यांनी अनेकदा आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे तर अनेकदा भाजप शिवसेनेवर तोफा डागल्या आहेत. एवढेच नाही तर शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना देखील आपल्या खास आणि आक्रमक शैलीत वेळोवेळी उत्तर दिले आहे. त्यांच्या या शैलीचा उपयोग आगामी निडणुकीत पक्षाला अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची तुलना थेट रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूनम महाजन यांच्या वक्तव्यावरून त्यांचा खरपूस समाचार घेतला होता “आपल्या वडीलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही”. अशा प्रकारचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर वरून ट्विट केले होते. त्यांचे हे ट्विट फारच गाजले होते.

एवढेच नाही तर ट्विटरवर नेहमी अ‍ॅक्टीव्ह असणारे जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा कविता देखील ट्विट केल्या आहेत ज्याला नेटकाऱ्यांनी रिट्विट केले आहे.