इंदिरा गांधींनी लोकशाहीचा ‘गळा’ घोटण्याचा ‘प्रयत्न’ केला होता, राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याचे वादग्रस्त ‘विधान’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बाबतीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले होते. या नंतर त्यांना हे विधान मागे घेण्याची वेळ आली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तीनही पक्षातील नेते वादग्रस्त विधान करत असल्याचे पहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हड यांनी बीडमध्ये वादग्रस्त विधान केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. बीड शहरातील संविधान बचाव रॅली दरम्यान ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून तीनही पक्षातील नेते एकमेकांच्या नेत्यांवर वादग्रस्त विधान करत आहेत. यापूर्वी संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यानेच वादग्रस्त विधान केल्यामुळे विरोधी पक्षांना आयते कोलीत मिळाले आहे. संजय राऊत यांनी कुख्यात करीम लाला याची इंदिरा गांधी यांची भेट घेतली असल्याचे वक्तव्य केले होते. आणि आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबतीत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आघाडीत वाद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून घटकपक्षांकडून एकमेकांच्या प्रिय नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य सुरुच आहेत. बीडमध्ये बुधवारी (दि.29) संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पटणाच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला हा इतिहास परत एकदा राज्यात आणि देशात घडेल. याचेच श्रेय जेएनयू आणि हैदराबाद युनिवर्सिटीला द्यावे लागेल असे आव्हाड यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, विद्यार्थी कोणालाही न घाबरता बाहेर पडत आहेत. कायदा समजून सांगत आवाज देत आहेत. आज जरी संख्या कमी असली तरी हळू हळू वाढेल आणि विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महिला आणि विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा क्रांती कोणीच रोखू शकत नाहीत. इंदिरा गांधींचा पराभव देखील याच विद्यार्थ्यांनी केला होता. हा देशाचा इतिहास आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like