Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाडांची टोलेबाजी; म्हणाले – ‘शिवसेनेच्या मनातील सांगायला मी ज्योतिष नाही’

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शनिवारी कल्याणमध्ये (Kalyan) मेळावा पार पडला. त्यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आघाडी धर्म पाळण्यावरून जोरदार टोलेबाजी केली. आघाडी धर्म पाळणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे सांगायला मी काही ज्योतिष नाही असा टोलाही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.

 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, कल्याण – डोंबिवलीचा (Dombivli) विकास हरवला असून अजून तो मला दिसला नाही.
केवळ भाजपच्या (BJP) विकास म्हात्रेंच्या (Vikas Mhatre) घराचा विकास झाला आहे.
बाकी कुठेच नाही, अशी टीकाही केली.
औद्योगिक वसाहतीतील (Industrial Estate) कारखाने स्थलांतरित झाल्यास कामगारांचा रोजगार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, माजी शिवसेना आमदार सुभाष भोईर (Former Shiv Sena MLA Subhash Bhoir) यांच्या सोबत झालेल्या गुप्त बैठकीसंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, माझे नाव जितेंद्र आव्हाड आहे.
मी कधीही बंद खोलीत चर्चा करत नाही.
गणेश दर्शनाकरिता मी भोईर यांच्या घरी गेलो होतो.
उघडपणेच सर्व काही करत असतो. शेतकरी मारहाण प्रकरणात (Farmer Beating Case) पोलिसांवर कोणाचा दबाव होता याबद्दल राजू पाटील (Raju Patil) यांना विचारा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आगामी कल्याण महापालिका निवडणुकीच्या (Kalyan Municipal Corporation) पार्श्वभूमीवर मोठ्या ताकदीनिशी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मेळाव्यास, माजी खासदार आनंद परांजपे (Former MP Anand Paranjape), प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव (State Vice President Pramod Hindurao),
जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे (District President Jagannath Shinde) यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कर्नाटक सरकार कोण ?
कर्नाटकमध्ये (Karnataka) झालेल्या हिजाब (Hijab) वादावरही आव्हाड यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, कोणी काय घालावं हे ठरवणारं कर्नाटक सरकार कोण ?
हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग (Minister for Dress Designing) नेमावा अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

 

Web Title :- Jitendra Awhad | i am not an astrologer to tell what is going on in the mind of shiv sena says jitendra awhad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा