Jitendra Awhad | ‘मी आता माझ्या मुलीला…’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची उद्विग्न प्रतिक्रिया !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jitendra Awhad | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्यावर ईडीने जप्तीची (ED Raid) कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र अशातच या कारवाईवर बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

 

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचाराल तर माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात (Maharashtra) ठेवणार नाही, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये (Jail) टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे, असं म्हणत आव्हाडांनी (Jitendra Awhad) भाजपवर (BJP) निशाणा साधला.

 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अशा प्रकराचं वक्तव्य नक्की कोणत्या कारणामुळे केलं हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
तर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
आता उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

 

Web Title :- Jitendra Awhad | Jitendra Awhad Reaction On ED

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | ’60 किलोमीटरमध्ये एकच टोल प्लाझा, स्थानिकांना मिळणार पास’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

 

Vehicle Registration Renewal New Rules | केंद्र सरकारकडून 15 वर्षावरील वाहन नुतनीकरण फीमध्ये 8 पटीने वाढ, सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा…

 

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं फक्त कोट घालून शेअर केला फोटो, व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांच्या हृद्याचे वाढले ठोके

 

Ananya Panday Glamrous Look | अनन्या पांडेनं काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून दिल्या हॉट पोज, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा ! जिनवानी इलेव्हन संघाचा सलग दुसरा विजय; गाडगे अँड कंपनी संघाची विजयी सलामी

 

Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…